Pandharpur: शेतक-यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी उजनीतून पाणी साेडले

या हंगामातील शेतीसाठी शेवटचे आवर्तन आहे.
water released from ujani dam for farming
water released from ujani dam for farmingsaam tv
Published On

Pandharpur News :

सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. काल रात्रीपासून डाव्या कालव्यातून 500 क्युसेक पाणी सोडले गेले आहे. (Maharashtra News)

सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सुरू असतानाच आता शेतीसाठी ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी 11 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या उपस्थितीत काल कालवा सल्लागार समिती बैठक झाली.

water released from ujani dam for farming
PM Modi To Visit Nashik : 'ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी त्यांना नको सत्तेची संधी'; 'प्रहार' ने झळकावले फलक

त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार रात्री पासून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यावर्षी पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या उजनी धरणात 5.34 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या हंगामातील शेतीसाठी शेवटचे आवर्तन आहे.

Edited By : Siddharth Latkar

water released from ujani dam for farming
Saam Impact : पंढरपुरातील तुळशी वृंदावन भाविकांसाठी खुले, QR Code च्या माध्यमातून जाणून घेता येते संतांचे महात्म्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com