Gosikhurd Dam News : 'गोसीखुर्द'चे 11 दरवाजे उघडले, चंद्रपूरसह गडचिरोलीला बसणार बँक वाॅटरचा फटका

alert to chandrapur and gadchiroli : नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी केले आहे.
Gosikhurd Dam News, Bhandara, Gadchiroli, water released from gosikhurd dam today
Gosikhurd Dam News, Bhandara, Gadchiroli, water released from gosikhurd dam todaysaam tv
Published On

- शुभम देशमुख

Bhandara News : मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत धो धो कोसळणा-या पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाले तुडूंब भरली आहेत. गोसे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 11 वक्रदार अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहेत. या 11 दरवाज्यातून 1 हजार 348.74 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. (Maharashtra News)

Gosikhurd Dam News, Bhandara, Gadchiroli, water released from gosikhurd dam today
Raju Shetti यांच्यावर अप्रत्यक्ष घणाघात...'लायकी नसलेल्यांनी आम्हांला शहाणपणा शिकवू नये'; 'स्वाभिमानी' वर रविकांत तुपकरांचा दावा? (पाहा व्हिडिओ)

भंडारा शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नदीनाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

Gosikhurd Dam News, Bhandara, Gadchiroli, water released from gosikhurd dam today
Nanded News : अण्णा भाऊ साठे यांचे पाेस्टर हटविणा-यांवर गुन्हा दाखल करा : 'शेकाप' चा पाेलिस ठाण्यात ठिय्या

गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने त्याचा फटका लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना बसणार आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क असून नदीकाठी असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com