Washim Zilha Parishad : सरकारी विहिरीतून पाण्याची चोरी; सीईओंकडून कारवाई

Washim News : वाशीम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ होत असून पाणी पातळीत घट होत आहे. त्यातच अनेक ठिकाणी धरणातून आणि विहरितून वारेमाप पाणी उपसा होत आहे
Washim Zilha Parishad
Washim Zilha ParishadSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : पाण्याची समस्या जाणवत असल्याने सरकारी विहिरीत मोटारी टाकून तेथून पाणी घेतले जात होते. या प्रकार वाशिमच्या रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी ग्रामपंचायत अंतर्गत घडला असून पाण्याची चोरी करणाऱ्या नागरिकांवर वाशिम जिल्हा परिषद सीईओ वैभव वाघमारे यांनी कारवाई केली असून मोटारी सह इतर साहित्य जप्त केले आहे. 

Washim Zilha Parishad
Pachora Accident : रुग्णालयात जात असताना झाला घात; ट्रकची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

वाशीम (Washim) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ होत असून पाणी पातळीत घट होत आहे. त्यातच अनेक ठिकाणी धरणातून आणि विहरितून वारेमाप पाणी उपसा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान जोगेश्वरी येथील जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जुन्या विहिरीची पाहणी करण्यात आली. (Zilha Parishad) पाहणी दरम्यान सरकारी विहिरीतून मोठ्या प्रमाणात विनापरवाना पाण्याची चोरी होत असल्याची बाब सीईओ वाघमारे यांच्या निदर्शनास आली. 

Washim Zilha Parishad
Gondia Crime News : वाद सोडवायला गेलेल्या लिपिकास शिक्षकाकडून मारहाण; लिपिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सीईओंची लागलीच कारवाई 

या पाहणी दरम्यानच सीईओ वाघमारे यांनी लागलीच याची गंभीर दखल घेऊन त्यांनी सर्वांसमक्ष या विहिरीमधून २ मोटारी आणि इतर साहित्य जप्त करून (Gram Panchayat) ग्रामपंचायतच्या हवाली केले. यामध्ये २ मोटार पंप, केबल, पाईप इत्यादी साहित्याचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com