Washim News: अंगणात खेळताना चिमुकलीचा विद्युत खांबाच्या ताराला हात लावला अन्...| CCTV Video

Electric Shock: अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय, अश्या वेळी महावितरणचे विद्युत खांब धोकादायक बनत आहेत.
Electric Shock
Electric Shock
Published On

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय, अश्या वेळी महावितरणचे विद्युत खांब धोकादायक बनत आहेत. अश्याच एका धोकादायक खांबाच्या ताराला चिमुकलीने हात लावला आणि अघटीत घडलं आणि ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, नेमकं काय घडलं आणि कुठं घडलं पाहुयात या रिपोर्ट मधून.

Electric Shock
Panvel-Somatne Cord Line : रेल्वे मंत्रालयाची पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान नवीन कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

ही दृश्य आहेत वाशिमच्या अनसिंग गावातील. रस्त्यावरचे विजेचे खांब आता सुरक्षित आहेत अशी म्हणण्याची वेळ आली आहे. स्वरा शिंदे ही सात वर्षीय चिमुकली ही खेळता खेळता तिने घराजवळच्या महावितरणच्या विद्युत खांबाच्या तणावाच्या ताराला हात लावला आणि अघटीत घडल. ती किंचाळली,काय झालं म्हणून सुनीता शिंदे बाहेर आल्या आणि मुलगी विद्युत खांबाच्या ताराला चिपकल्याच लक्षात आल्याने त्यांनी आपल्या मुलीला एक क्षणात बाजूला केलं. त्यामुळे त्या आपल्या मुलीचा जीव वाचवू शकल्या.

Electric Shock
Spain Power Outage: युरोपची बत्ती गूल; फ्रान्स,स्पेनसह अनेक देशात ब्लॅकआऊट, विमान उड्डाणासह मेट्रोला ब्रेक

अशा घटना टाळण्यासाठी आपल्या चिमुकल्यांना,जनावरांना यापासून दूर कसे ठेवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक वेळेस कुणीतरी वाचवायला येईल अशी शक्यता कमी असते. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवा आणि सुरक्षित रहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com