Washim Accident : समृध्दी महामार्गावर पुन्हा अपघात; महामार्गावरील दुभाजकाला धडकली कार
Samruddhi Highway Accident

Washim Accident : समृध्दी महामार्गावर पुन्हा अपघात; महामार्गावरील दुभाजकाला धडकली कार

Samruddhi Highway Washim Accident : साई दर्शनासाठी जाणाऱ्या पश्चिम बंगालमधील साई भक्तांच्या कारला अपघात झालाय. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झालेत.

मनोज जयस्वाल, साम प्रतिनीधी

शिर्डी येथील साईबाबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कारचा अपघात झालाय. येथील समृद्धी महामार्गावर दुसरा अपघात झालाय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा परिसरातील लोकेशन १७५ वर मुंबई कॉरिडोरवर कारचा समोरचा टायर फुटला. त्यामुळे कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात दोनजण गंभीर तर एक किरकोळ जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे साईभक्त पश्चिम बंगालवरुन शिर्डीकडे जात होते.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच १०८ लोकेशन समृद्धी महामार्ग पायलट विधाता चव्हाण, डॉ मुबशीर घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये सयान जना वय २४, दिव्यांनी जना वय ४८ हे दोघे गंभीर जखमी झालेत. तर सुजाण जना वय ५२ रा. कोलकता वेस्ट बंगाल ह्या किरकोळ जखमी झाल्यात.

वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. त्यावेळी समृद्धी महामार्गावर मदतीसाठी अग्निशामक दल,समृद्धी महामार्ग हायवे पोलीस, समृद्धी महामार्ग व कारंजा ग्रामीण स्टेशनचे पोलीस कर्मचारी हजर होते. सदर घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा करत आहेत.

Washim Accident : समृध्दी महामार्गावर पुन्हा अपघात; महामार्गावरील दुभाजकाला धडकली कार
Kolhapur News: कोल्हापूरात अपघाताचा थरार, कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू तर ६ गंभीर जखमी; अपघात CCTV मध्ये कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com