Weather updates | Weather Forecast
Weather updates | Weather ForecastSaam Tv

Weather: या राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा; 18 जिल्ह्यांना अलर्ट

मागील काही दिवसामध्ये महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे, राज्यामध्ये आता पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.

पुणे: मागील काही दिवसामध्ये महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानामध्ये (maharashtra) वाढ झाल्यामुळे, राज्यामध्ये आता पावसासाठी पोषक हवामान (Rain weather) तयार झाले आहे. पुढील २ दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी हलका तआणि मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. आज पुण्याबरोबरच १८ जिल्ह्यांना (districts) हवामान विभागाने येलो आणि ऑरेंज अलर्ट (Weather updates) जारी करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

काल नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात शहादा तालुक्यामध्ये गारपिटीबरोबरच जोरदार अवकाळी पाऊस (rain) झाला आहे. यामुळे परिसरात शेतकऱ्याचे (farmer) मोठे नुकसान झाले आहे. पपई, केळी, गहू, हरभरा अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास ११ गावात ११०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे ७०० हेक्टरवर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील आणखी ३ दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आहे.

आज हवामान विभागाने नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही ठिकाणी गारपीटही होणार आहे. यामुळे परिसरात शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय आज पुण्यासह पालघर, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Weather updates | Weather Forecast
संभाजी ब्रिगेडचा महिलादिनी पाण्यासाठी महिलांचा महानगरपालिकेवर घागर मोर्चा

पुढील काही तासामध्ये याठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. उद्या देखील कमी अधिक प्रमाणात ही स्थिती कायम राहणार आहे. उद्या कोकणबरोबरच मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि लगतच्या विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. सध्या वाऱ्यांच्या संगमामुळे आणि पूर्वेकडे वेगवान वाऱ्यामुळे केरळ किनारपट्टी ते कोकण किनार्‍यापर्यंत पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com