Wardha Crime : बनावट प्रोफाईल तयार करून तरुणांना दाखवायची भलतंच अमिष; अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यात

तरुणींची बनावट प्रोफाईल सादर करुन तरुणांची फसवणूक करणाऱ्या बनावट विवाह नोंदणी संस्थेचा पर्दाफाश केला.
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam TV

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Crime News : बनावट विवाह संस्था थाटत तरुणांना लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना तरुणींची बनावट प्रोफाईल सादर करुन तरुणांची फसवणूक करणाऱ्या बनावट विवाह नोंदणी संस्थेचा पर्दाफाश केला. ही कारवाई सायबर सेलमधील पोलिसांकडून वर्धेच्या सुदर्शननगर परिसरात करण्यात आली. याप्रकरणी वर्धाच्या रामनगर पोलिसात संचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.(Latest Marathi News)

Wardha Crime News
Malegaon Crime : शेतात एकटीच गेली होती महिला; अज्ञात व्यक्तीनं केलं क्रूर कृत्य, धक्कादायक घटनेनं खळबळ

महेंद्र सोनोने यांना त्यांच्या मोबाईलवर विवाह संस्थेच्या नावाखाली एक कॉल आला होता. संस्थेने महेंद्रला लग्नासाठी एका मुलीचा फोटो व बायोडाटा पाठविला होता. त्यानंतर महेंद्रला दोन महिन्यानंतर पुन्हा त्याच विवाह संस्थेच्या चालकाने फोन करुन मुलीचा फोटो आणि बायोडाटा पाठविला. मात्र, मुलीचा फोटो पहिले जो पाठविला तोच होता पण, बायोडाटा बदललेला होता. हे समजताच महेंद्रने याबाबत वर्धा पोलिसांच्या अधिकृत मेल आयडीवर याबाबतची तक्रार मेल केली.

दरम्यान सायबर सेलमधील  पोलिसांनी (Police) तांत्रिक पद्धतीने तपास सुरु केला असता सुदर्शननगर येथील मंगलम नामक विवाह संस्थेत भोंगळ कारभार सुरु असून या ठिकाणी बनावट व खोटी संस्था स्थापन करुन ग्राहकांची फोनद्वारे फसवणूक केली जात असल्याचे समजले.

सायबर सेलमधील पोलिसांनी सुदर्शननगर गाठून तपासणी केली असता २५ वर्षीय तरुणी तिच्या आईच्या नावे असलेल्या आस्थापना नोंदणीच्या नावावर बनावट विवाह संस्था स्थापन करुन नागरिकांच्या बनावट प्रोफाईल तयार करुन ग्राहकांना पुरवून त्यांच्याकडून स्वतहाच्या खात्यावर पैसे घेण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली.

Wardha Crime News
Thane News: स्थानिक गुंडाच्या धमकीने तरुण घाबरला, उचललं टोकाचं पाऊल; ठाण्यातील धक्कादायक घटना

पोलिसांनी या तरुणीवर गुन्हा दाखल केला असून एक संगणक, एक लॅपटॉप, सात विविध कंपनीचे मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, दिनेश बोथकर, अनुप कावळे, अक्षय राऊत, विशाल मडावी, अंकित जिभे, शाहिन सय्यद, स्मिता महाजन यांनी केली.

सायबर सेलने तांत्रीक पद्धतीने तपास केल्यावर त्यांना मोबाईलमधील सीमचे लोकेशन सुदर्शननगर नगर येथे असल्याचे समजले. दरम्यान पोलिसांनी काही डमी ग्राहकांना त्या ठिकाणी पाठवून माहिती काढली असता त्या ठिकाणी चार ते पाच मुली वेगवेगळ्या फोनद्वारे कॉल करीत असल्याचे दिसून आले. दरम्यान बनावट विवाह संस्था सुरु असल्याचे समजताच पोलिसांनी बनावट विवाह संस्थेचा पर्दाफाश केला.

येथे ग्राहकांना लग्नाचे आमिष देत लग्नासाठी फोटो व बनावट प्रोफाईलमध्ये स्वत:चा मोबाईल क्रमांक देऊन ग्राहकांकडून पैसे उकळले जात होते. त्यांना फोन करुन पैसे उकळल्यानंतर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करुन ठेवायची. संगणकातील डाटामध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार बदल करुन ग्राहकांना १०००, २००० तसेच ३००० रुपयांचे पॅकेज देऊन डाटा पुरविला जात होता. अशाप्रकारे संस्था चालक तरुणी ग्राहकांची फसवणूक करायची.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com