रात्री अवकाशातून गेलेल्‍या यंत्राचे अवशेष; शेतात पडलेले आढळले

रात्री अवकाशातून गेलेल्‍या यंत्राचे अवशेष; शेतात पडलेले आढळले
Wardha News
Wardha NewsSaam tv

सुरेन्द्र रामटेके

वर्धा : विदर्भातील काही जिल्ह्यात उल्कापात सदृष्य आगीचे लोंढे आकाशातून पडतांना गुडीपाडव्याच्या रात्री विविध गावकऱ्यांनी पाहले. जेवढे कुतूहल तेवढाच संभ्रम नागरिकांत कायम असतांना आज (3 मार्च) वर्धा (Wardha) जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव येथे अवकाशातून पडलेले यंत्र अवशेष आढळून आले. सदर यंत्र पाहण्यास नागरिकांची गर्दी पाहवयास मिळाली. सदर यंत्राचे अवशेष समुद्रपूर आणि गिरड पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. (vardha news The remains of a machine that passed through space ar night)

Wardha News
Jalgaon: जिल्‍ह्यात उष्‍माघाताचा आणखी एकाचा मृत्‍यू

शनिवारी रात्री आकाशात दिसणारा प्रकार त्यानंतर जमिनीवर पडलेले हे अवशेष हा काय प्रकार आहे. याचा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नितीन सोरते हे सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना एक सिलेंडरसारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची आढळून आली. त्यांनी लागलीच या संबंधी समुद्रपुर पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक राम खोत यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी जाऊन हे अवशेष ताब्यात घेतले. तर धामणगाव येथील शेतकरी भाऊराव ननावरे यांच्या गावाशेजारच्या शेतामध्ये सकाळी अवशेष आढळून आले. यावेळी गावातील नागरिकांनी हे अवशेष बघण्यासाठी एकच गर्दी केली.

सदर घटनेची माहिती गिरड पोलिसांना मिळताच ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन सदर अवशेष ताब्यात घेतले आहे. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com