होय आम्ही चुका केल्या..पुन्‍हा सरकार आले तरी परत‍ चुक करू : चंद्रशेखर बावनकुळे

होय आम्ही चुका केल्या..पुन्‍हा सरकार आले तरी परत‍ चुक करू : चंद्रशेखर बावनकुळे
Chandrasekhar Bavankule
Chandrasekhar BavankuleSaam tv

वर्धा : होय आम्ही चूक केली, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वीज मोफत दिली ही चूक केली आणि पुढे आमचे सरकार आले तर परत ही चूक करू. शेतकऱ्यांना वीज बील देणार नाही अशी घोषणा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केली. (wardha news Chandrasekhar Bavankule statement in farmer light connection cut)

Chandrasekhar Bavankule
पंतप्रधानांनी माफी मागावी; भाजप खासदारांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन

शेतकऱ्यांचे (Farmer) वीज कनेक्शन खंडित करण्याचा सपाटा वितरण कंपनीने केला आहे. ते तात्काळ थांबवावे पीक निघेपर्यंत वीज कनेक्शन तोडू नये. या मागणीला घेऊन हिंगणघाट क्षेत्राचे भाजपचे आमदार समीर कुणावार गेल्या पाच दिवसांपासून साखळी उपोषणावर बसले आहेत. आज या साखळी उपोषणाला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. या वेळेस त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्‍यावर आरोप केले.

तर विधान परिषद सभागृहाच्‍या पायऱ्यावर आंदोलन

सरकार या आंदोलनाला (Wardha News) सकारात्मक घेतले नाही; तर येत्या तीन तारखेला विधान परिषदेचे सभागृह सुरू होणार त्या सभागृहाच्या पायऱ्यावर बसून आम्ही भाजपचे सर्व आमदार आंदोलन करू. त्यावर ही सरकार जर मानले नाही, तर आझाद मैदानावर हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन सरकारला वेटीस धरू. यासोबत वैधानिक विकास महामंडळ का बंद केली? रस्त्याचे काम बंद का केले ग्रामपंचायतीच्या लाईट बिल रस्त्याचे वीज कनेक्शन का कापले? असा प्रश्न माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित केला.

तथ्‍य असेल तर जेलमध्‍ये टाका

टीव्ही मीडियामध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरोपात तथ्य असेल तर चौकशी लावा. रोज– रोज टीव्ही मीडियाला सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न टीव्ही मीडियावर येऊ द्या. महाराष्ट्राच्या बारा कोटी लोकांचे प्रश्‍न पुढे येऊ द्या. तुमच्याकडे गृह खाते आहे. मुख्यमंत्री आहे तथ्य असेल तक्रार द्या चौकशी करा. दोषी आढळल्यास जेलमध्ये टाका मीडिया वेळ महत्वाचा आहे. जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे आले पाहिजे. पुढे काय करणार सरकारच्यावतीने ते सांगितले पाहिजे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com