वारकऱ्यांना पोलीस दमदाटी करत असल्याचा विश्व वारकरी सेनेचा आरोप

संघटनेच्या प्रतिनिधींना आळंदी पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत.
वारकऱ्यांना पोलीस दमदाटी करत असल्याचा विश्व वारकरी सेनेचा आरोप
वारकऱ्यांना पोलीस दमदाटी करत असल्याचा विश्व वारकरी सेनेचा आरोपजयेश गावंडे
Published On

जयेश गावंडे

अकोला - माझी वारी माझी जबाबदारी या अभियानांतर्गत काही वारकरी संघटना Vishwa Warkari Sena यांनी एकत्र येऊन फक्त शंभर वारकऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी वारीचे आयोजन केले आहे. दरम्यान संघटनेच्या प्रतिनिधींना आळंदी Alandi पोलिसांनी नोटीस Notice पाठवल्या आहेत. तर वारकऱ्यांनी पोलिसांना Police फोन करून सांगितले आहे की, आम्ही आळंदी मध्ये येणार नाही बाहेरूनच दिंडीची सुरुवात करणार आहोत आमच्या दिंडी सोहळा मध्ये फक्त शंभर वारकरी राहणार आहेत आणि प्रत्येकाच्या जवळ ओळखपत्र दिले जाणार आहे. दिंडी मध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील. Vishwa Warkari Sena allegations on police

हे देखील पहा -

मात्र तरीसुद्धा आपण दिंडी काढली तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी नोटीस आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलेली आहे. नोटीस मध्ये वारकऱ्यांच्या अनुयायांना हस्तक हा शब्द वापरलेला आहे खऱ्या अर्थाने हा शब्द गुंड प्रवृत्तीच्या लोकांकरिता वापरला जातो पण नाइलाजाने आज वारकऱ्यांना हा शब्द पोलिसांच्या कडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे या नोटीसचा विश्व वारकरी सेनेने जाहीर निषेध केलेला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com