Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच घोषणाबाजी, विश्व मराठी संमेलनातील प्रकार; पाहा नेमकं काय घडलं?

सध्या विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. वरळीमध्ये आयोजित केलेल्या मराठी तितुका मेळवावा - विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv
Published On

Mumbai: गेल्या दीड महिन्यांपासून कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद चांगलाच तापला आहे. राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही या घटनेचे जोरदार प्रतिसाद उमटलेले पाहायला मिळाे होते. अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात ठरावही एकमताने मंजूर झाला होता. मात्र तरीही हा वाद अद्याप सुरू असून मुंबईत विश्व साहित्य संमेलनातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले.

Eknath Shinde
Pune News: माकडासोबत सेल्फीचा मोह जीवावर, पुण्यातील शिक्षकाचा दरीत पडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईत (Mumbai) सध्या विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. वरळीमध्ये आयोजित केलेल्या मराठी तितुका मेळवावा - विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे भाषण सुरू असतानाच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुंबईतील मराठी भाषा आणि मराठी लोक यांबद्दल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. याचवेळी सभागृहात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील गावांवरुन घोषणाबाजी सुरु केली. "बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" अशा घोषणा यावेळी दिल्या गेल्या. यामुळं मुख्यमंत्री क्षणभर थांबले.

Eknath Shinde
Dhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडेंच्या कारला अपघात

या घोषणाबाजीनंतर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "त्यावर यासाठी सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीला गेलो होतो. यावेळी गृहमंत्र्यांनी पहिल्यांदा या विषयावर हस्तक्षेप केला, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे," असे स्पष्टिकरण दिले आहे.

त्याचबरोबर "मुंबईसह महाराष्ट्र मिळवताना १०६ लोकांनी बलिदान दिलं याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळं मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही. मुंबईत मराठी ठसा आणि मराठी टक्का कायम राहावा यासाठी देखील आमच्या सरकारचे प्रयत्न सुरु आहेत," असेही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com