वारकऱ्यांना हे सरकारी बंधन नको आहे. त्यासाठीच ते आक्रमक झाले आहेत. बंडातात्या कऱ्हाडकर यांच्यावरही पोलिसांनी वारीच्या कारणातून कारवाई केली. काही कीर्तनकारही निर्बंधांना विरोध करीत आहेत. आता विश्व हिंदू परिषदही वारीसाठी आग्रह धरीत आहे.
अहमदनगर ः आषाढी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसह देशभरातील भाविकही विठूरायाच्या भेटीसाठी दाखल होतात. वैष्णवांसाठी हा अनोखा सोहळा असतो. परंतु कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही भेटच झालेली नाही. कितीही अडचण असली तरी वारीत खंड पडत नाही. यंदा कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आहे. तिसरीबाबत शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारने वारीवर निर्बंध लादले आहेत.
वारकऱ्यांना हे सरकारी बंधन नको आहे. त्यासाठीच ते आक्रमक झाले आहेत. बंडातात्या कऱ्हाडकर यांच्यावरही पोलिसांनी वारीच्या कारणातून कारवाई केली. काही कीर्तनकारही निर्बंधांना विरोध करीत आहेत. आता विश्व हिंदू परिषदही वारीसाठी आग्रह धरीत आहे.Vishwa Hindu Parishad demands permission for Wari
सरकारने मोजक्या वारकऱ्यांना दिंडीने जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेत आली भावना व्यक्त केली आहे. जर दिंडीला परवानगी दिली नाही तर येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाऊन महापूजा करू नये. विठ्ठल त्यांना आशीर्वाद देणार नाही, असेही विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एकीकडे हॉटेल, मॉल, दारूच्या दुकानांना परवानगी देता आणि वारकऱ्यांना दिंडीने जायला ती नाकारली जाते. हा कुठला न्याय आहे. दारूच्या दुकानात लोकं एकत्र जमल्यावर कोरोनाचा संसर्ग होत नाही का, असा सवालही विश्व हिंदु परिषदेने केलाय. Vishwa Hindu Parishad demands permission for Wari
सरकारने परवानगी दिली नाही तर येत्या 17 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक दिंडी काढून सरकारचा निषेधदेखील करण्यात येणार आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.नगर येथे विश्व हिंदू परिषद आयोजित पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी बोलत होते. या प्रसंगी भागवत व रामायणाचार्य वासुदेव महाराज खेडकर, कार्याध्यक्ष अॅड जय भोसले, मिलिंद मोभरकर,जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गंधे, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, सहमंत्री गौतम कराळे आदी उपस्थित होते.
Edited By - Ashok Nimbalkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.