
सोलापूर : बार्शीच्या (Barshi) लोकांना कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विशाल फटेने आज स्वतः हून पोलिसांसमोर शरण येणार असल्याची माहिती त्याने स्वत: युट्युब वरती एक व्हिडीओ जारी करत दिली होती आणि त्यानुसार तो आता सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला असल्याची अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी (Tejaswi Satpute) दिली आहे.
दरम्यान विशाल फटे (Vishal Fate) स्कॅममध्ये आणखी पाच तक्रारदरांची पडली भर पडली असून आता फटे विरोधात तक्रारदारांचा आकडा 81 वर पोहोचला असून आत्तापर्यंत 18 कोटी 78 लाख 17 हजारांचा घोटाळा उघडं झाला आहे. शिवाय आज विशाल फटे स्वतः हून माध्यमासमोर आल्यानंतर हे तक्रारदार पोलिसात फिर्याद देत असल्याचही पोलिसांनी सांगितलं आहे.
आणि त्यामुळं सगळ संपलं -
विशाल फटे आपल्या व्हिडीओद्वारे (Video) म्हणाला होता की, 'मी जो व्यवसाय केला त्यात कुटुंबातील कुठल्याच सदस्याचा सहभाग नव्हता. फक्त कागदोपत्री ते संचालक होते,' अशी माहिती विशाल फटे याने व्हिडीओमधून दिली तसंच ज्यांचा मनीमल्टीप्लिकेशनवर विश्वास बसत नाही त्यांनी ट्रेंडिंग व्हीवच्या पेड प्लॅनमध्ये जाऊन राहुल कृष्णाच्या फंड्याचा अभ्यास करावा. मी देखील तो अभ्यास करत होतो. पण मला वेळ कमी मिळाला आणि त्यामुळं सर्व संपलं,' असं फटे याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.