Viral Video : भयंकर ! मध्यरात्री घराच्या स्लॅबमधून विचित्र आवाज आला; काठी दाखवताच समोर जे आलं ते भयंकरच...

कल्पनेत सांगितलेल्या घटनेपेक्षाही प्रत्यक्षात ही घटना फार भयानक पद्धतीने घडली आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Snake Video : कल्पना करा तुम्ही रात्री गाढ झोपेत आहात. मध्येच घराच्या छतावरून काही आवज ऐकू येतात. तुम्ही उठता आणि तुमच्या डोळ्यासमोर भयंकर विशाल साप उभा राहतो. खरोरखच ही गोष्ट कल्पनेच्या पलीकडे आहे. कोणत्याही व्यक्तीला हे पाहून पळता भुई थोडी होईल. मात्र मलेशिया येथे खरोखर ही घटना घडली आहे. कल्पनेत सांगितलेल्या घटनेपेक्षाही प्रत्यक्षात ही घटना फार भयानक पद्धतीने घडली आहे. (Latest Viral Snake Video News)

येथील व्यक्तींनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धाडली भरेल. मलेशिया येथे राहणारे एक कुटुंब रात्री झोपेत होते. मध्यरात्री अचानक घराच्या स्लॅबमधून त्यांना काही आवाज ऐकू आले. हे आवाज ऐकून वरच्या मजल्यावर काही तरी गडबड किंवा तेथील व्यक्ती काही हालचाली करत असतील, त्यामुळे हा आवाज येत आहे, असं त्यांना वाटलं.

Viral Video
Viral Video: लग्नाला नकार देताच चिडला, केस पकडून वार करत भर चौकातून फरफटत नेले; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

काही वेळाने हा आवाज वाढला. घरात सर्व शांत राहून आवाज ऐकत होते. त्यावेळी खूप विचित्र आवाज आणि हालचाली जणवल्या. हा आवाज माणसांचा नाही याची खात्री त्या कुटुंबातील व्यक्तींना पटली. त्यामुळे त्यांनी तातडीने परिसरातील शेजाऱ्यांना घरी बोलावले. त्यातील एका शेजाऱ्याने आपत्कालीन व्यवस्थापकांना संपर्क साधला. त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.

Viral Video
Viral News : कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कंपनीकडून भन्नाट सूट; स्क्रीनवरील मॅसेज वाचून स्वतःच्या डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

घराच्या स्लॅबमध्ये काहीतरी आहे हे त्यांना समजले. त्यानंतर अचानक एका सापाची शेपटी स्लॅबला असलेल्या फटीतून दिसू लागली. हे पाहून सगळ्यांच्याच पोटात गोळा आला. स्लॅबमध्ये साप आहे हे त्यांना समजले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या टीममधील एका व्यक्तीने त्या सापाला खाली घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाने स्लॅबवर थोडी सावकाश काठी मारली.

काठीचा फटका आताच धडाधड तीन मोठे अजगर जमिनीवर आदळले. हे दृश्य खरोखर हृदय हेलावणारे आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता असं नेटकरी म्हणत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com