विनोद पाटील आगामी काळात मोठा राजकीय निर्णय घेणार? चर्चेला उधाण

विनोद पाटील यांची भाजपशी जवळीक वाढत असल्याची कुजबुज राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरु झाली आहे.
Chandrshekhar Bawankule
Chandrshekhar BawankuleSaam Tv
Published On

मुंबई - भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी शुक्रवारी औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यामध्ये विनोद पाटील यांच्या निवासस्थानी निवासस्थानी आले होते. त्यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. गणेशोत्सवामध्ये विशेष करून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अतुल सावे यांचीही भेट घेतली. अलीकडच्या काळात त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठीतून विनोद पाटील आगामी काळात काही राजकीय निर्णय घेणार आहेत की काय? अशी जोरदार कुजबुज सुरु आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य या पदावर काम केले. २०१४ साली मध्य मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढले. त्यानंतर राष्ट्रवादीतून अचानक बाजूला होऊन विनोद पाटील मराठा आरक्षणावर न्यायालयीन लढाई आणि राज्यात झालेल्या 58 मूक मोर्चासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

आता विनोद पाटील यांची भाजपशी जवळीक वाढत असल्याची कुजबुज राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरु झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी याचिका दाखल केल्यानंतर ते चर्चेत आले. त्यानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत नगरविकास मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानी आले होते. यानंतर अचानक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी त्यांचे नाव पुढे आले.

Chandrshekhar Bawankule
Wardha: दागिने चमकविण्यास आले अन् दागिने घेऊन पसार झाले; हिंगणघाट येथील घटना

परंतु त्यांनी शिवसेनेकडून लढण्यास नकार दिल्याची चर्चा त्यावेळी होती. अलीकडच्या काळात त्यांच्या भाजपसोबत बैठका वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा केली. आता आजवरच्या सर्व नेत्यांच्या भेटीगाठीतून पाटील आगामी काळात काही राजकीय निर्णय घेणार आहेत की काय? अशी जोरदार कुजबुज सुरु झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com