Vinayak Raut : बावनकुळे यांची स्मरणशक्ती कमी झाली; विनायक राऊतांचा टोला

आज या महाराष्ट्रामध्ये घाणेरड्या राजकारणामुळे आणि खऱ्या अर्थाने पैशाने राजकारणही विकत घेतले जात आहे.
Vinayak Raut
Vinayak RautSaam Tv
Published On

अकोला - सध्या आमदार एकमेकांना मारण्याची भाषा वापरत आहेत. लोकप्रतिनीधि खालच्या पातळीवर टीका करतायत. राज्यातील या सध्याच्या राजकारणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज या महाराष्ट्रामध्ये घाणेरड्या राजकारणामुळे आणि खऱ्या अर्थाने पैशाने राजकारणही विकत घेतले जात आहे. हा धंदा ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने सुरू केला, त्यानंतर महाराष्ट्रातले वैचारिक पातळी घसरलेली आहे आणि भाऊबंधकी सुद्धा नष्ट झालेली आहे.

Vinayak Raut
Bullock Cart Race : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

एकमेकांवरचं प्रेम सुद्धा शत्रू समान झालेलं आहे. त्यामुळे हे आज महाराष्ट्रच दुर्दैव आहे. सध्या पैशाची सुद्धा मस्ती आहे, पैशाच्या आणि सत्तेच्या मस्तीमध्ये काल-परवापर्यंत आपल्या सहकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न हे बेमान आणि गद्दार लोक करत असल्याचे मत खासदार विनायक राऊतांनी व्यक्त केलं.

उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही युती करु शकतात, बावनकुळे यांच्या या व्यक्तव्यावर राऊत म्हणालेत की, कदाचित बावनकुळेंची स्मरणशक्ती वयामानाप्रमाणे कमी झाली असणार. पक्षाच्या आसरायाने काश्मिरी पंडितांची हत्या झाली, काश्मिरी पंडित यांची घर उध्वस्त झाली, बेचिराख झाला त्या पक्षाच्या नेत्या मुक्ती मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाने (BJP) मिठी मारलेली आपण पाहिले आहे.

राजकारणातील मिठी मारत असताना भारतीय जनता पक्षाचे तसेच बावनकुळे हिंदुत्व कुठे गेलं. त्यामुळे आम्हाला त्यांनी शहाणपणा शिकवण्यापेक्षा आम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली काय जळते ते बघा असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com