मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं - विनायक राऊत

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपला मुंबईत नारायण राणेंकडून काही फायदा होणार नाही. मागच्या ३० वर्षांपासून मुंबईत शिवसेना जे काम करते आहे अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं - विनायक राऊत
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं - विनायक राऊतअनंत पाताडे
Published On

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग - ओबीसी OBC समाजाला आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांना आधारवड म्हणून मुंडे कुटुंबीय होते. गोपीनाथ मुंढेच्या Gopinath Munde पाठोपाठ पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करता आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या सरकारने पंकजा मुंडे Pankaja Munde यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले.त्याचबरोबर एकनाथराव खडसे Ekhanth Khadse यांना बाद करून टाकल. जे जे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते त्या सर्वाना राजकीय जीवनातून उध्वस्त करण्याचे काम फडणवीस यांच्या माध्यमातून झाले.आज ही पंकजा मुंडेना पूर्णपणें राजकारणाच्या बाहेर समाजकारणाच्या बाहेर भाजपाने फेकून दिले आहे असा आरोप विनायक राऊत Vinyak Raut यांनी केला आहे.

हे देखील पहा -

पुढे ते म्हणले की, भाजपने जर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल.नारायण राणे यांनी यापूर्वी मंत्री असताना सुद्धा त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव राणेंनी घेतलेला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपला मुंबईत नारायण राणेंकडून काही फायदा होणार नाही. मागच्या ३० वर्षांपासून मुंबईत शिवसेना जे काम करते आहे. त्या विश्वासावर पुनश्च एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी २०२४ साली मुंबईवर भगवा फडकवेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com