विश्वासघात करणे हा ठाकरे सरकारचा स्थायीभाव : आमदार विनायक मेटे

बीड येथे आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत आमदार मेटे बोलत होते.
vinayak mete
vinayak meteSaam Tv

बीड : हे सरकार बनवतांना शरद पवार यांनी मुहूर्त बघितला नव्हता. जेव्हा पासून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे, तेव्हापासून संकटाची मालिका सुरू झाली आहे. हे पालथ्या पायाच सरकार अपशकुनी आहे अशी घणाघाती टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे vinayak mete यांनी केली.

बीड येथे आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत आमदार मेटे बोलत होते. ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारला दाेन वर्ष पूर्ण झाले आहेत. या दोन वर्षांत सरकारची उपलब्धी म्हणजे सर्वांचा विश्वासघात केला. व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, मराठा ,ओबीसी मुस्लिम, आरक्षण यासंदर्भात सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे असे मेटे यांनी नमूद केले.

vinayak mete
शिंगणापूरात लहान मुलांना आढळले मृत अर्भक; पाेलिस तपास सुरु

मुस्लिम समाजाचा प्रश्न साेडविला नाही

नवाब मलिक यांना त्यांचा जावाई, समीर वानखेडे आणि आर्यन खान इतकेच दिसत आहे. मलिकांना मुस्लिम समाज दिसत नाही. मुस्लिम समाजाचा आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला जात नाही. तसेच त्यांच्या सुविधा संदर्भात देखील कुठला निर्णय घेतला गेला नाही. त्यावर मलिक गप्प आहेत अशी टीका आमदार मेटे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर केली.

विश्वासघात करणे हा ठाकरे सरकारचा स्थायीभाव

शेतकऱ्यांच्या नावावर हे सरकार राजकरण करत आहे दहा हजाराची घोषणा केली पण हेक्टरी पाच हजार मिळाले. विश्वासघात करणे हा उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सरकारचा स्थायीभाव आहे. सगळ्यांशी विश्वासघात या सरकारने केला आहे. पीक विम्यात बीडला वगळले. लबाडी आणि लबाडी पलीकडे या सरकारमधील नेत्यांनी काहीच केलेले नाही, शेतकरी नागवला असून उघडयावर पडलाय. शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी नितीन राऊत यांच्या माध्यमातून वीज कनेक्शन ताेडणे सुरू आहे. सर्व सामान्य लोकांचा विश्वासघात केला जात आहे. वीज बिल वसुली संदर्भात दादागिरी सुरू असल्याचा आराेप मेटेंनी केला.

धनंजय मुंडे यांनी बीडला भ्रष्टाचारी बनवलं

बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री कसा नसावा हे दोन वर्षात सिद्ध केलं. ते परळीच्या बाहेर पडत नाहीत. ते फक्त एका मतदार संघाचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या फोल ठरल्या अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली. महाराष्ट्राला भ्रष्टाचारी महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी बनवला आणि धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला भ्रष्टाचारी बनवल असेही मेटे यांनी नमूद केले.

शिवरायांचे फक्त नाव घ्यायचे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सरकार चालवता. त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी दोन वर्षात दोन मिनिट वेळ काढता आला नाही. यावरून सरकारची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची आत्मीयता दिसून येते. मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण संदर्भात काहीच केले नाही. ओबीसी संदर्भात गळे काढले परंतु त्यांच्यासाठी देखील काहीच प्रयत्न करत नाहीत. आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत असे आमदार विनायक मेटे यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com