शिंगणापूरात लहान मुलांना आढळले मृत अर्भक; पाेलिस तपास सुरु

अधिक तपास करवीर पाेलिस करीत आहेत
new born baby
new born baby

काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर (ता. करवीर) येथील माळवाडी परिसरातील एका शेतात नवजात अर्भकाचा मृतदेह लहान मुलांना आढळला. त्यानंतर मुलांनी आरडाआेरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी अर्भक पाहताच स्थानिक पाेलिसांना कळविले.

new born baby
NCP बंडखाेर विजेत्याच्या घरी पाेहचले BJP चे चंद्रकांतदादा पाटील

माळवाडी या भागात रविवारी सायंकाळच्या चार सुमारास येथे खेळणा-या लहान मुलांना हे अर्भक आढळले. एका पाेत्यात ते अर्धवट दिसत हाेते. साधारणतः तीन ते चार दिवसांचे हे अर्भक असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

या परिसरातील कुत्र्यांनी या अर्भकाचे लचके ताेडले हाेते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली हाेती. या परिसरात मृत अर्भक पडल्याची माहिती मिळताच ते पाहण्यासाठी बघ्यांची माेठी गर्दी झाली. पाेलिसांनी संबंधित मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास करवीर पाेलिस करीत आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com