धुळे - सध्या संपुर्ण जगासोबतच देशामधेसुध्दा country कोरोनाचा corona कहर सुरु आहे. कोरोनाच्या महामारीमुळे pandamic मागील वर्षापासून अनेक सण उत्सव बंद आहेत यामध्ये संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठूरायाचा उत्सव vithhal सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे उत्सवात साजरी करु शकत नाही. Villagers chanted Vithuraya on the occasion of Ashadi Ekadashi in Arvi village
हे देखील पहा -
दरवर्षी निघणारी आषाढी वारीसुध्दा Ashadhiwari या महामारीमुळे बंद आहे. मात्र ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपुरमध्ये आषाढीचा उत्सव सोहळा सुरु आहे.
याच विठूरायाच्या भक्तीपोटी आपआपल्या परिने आणि जमेल त्या पध्दतीने लोक विठूरायाची पुजा करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील आर्वी गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांनी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपारिक पद्धतीने मात्र कोरोनाच्या सावटाखाली शासनाच्या सर्व कोरोना नियमावलींचे पालन करत विठू माऊलींचे भाविकांनी दर्शन घेतले. सकाळपासूनच या ठिकाणी विठू माऊलींचा गजर भाविकांतर्फे सुरू आहे.
गावातील जिल्हा परिषद सदस्यांना आजच्या आरतीचा मान मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आला.
भाविकांच्या उपस्थितीमध्ये विठू माऊलीची आरती टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये करण्यात आली.
दरम्यान यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे आषाढी एकादशी निमित्ताने उत्सव साजरा करण्यास प्रशासनातर्फे मनाई करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने विठू माऊलीचा गजर आर्वीतील भाविकांतर्फे करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.