रायगडच्या पायथ्याजवळील रस्ता खचल्याने; 'या' गावकऱ्यांना सोसावा लागतोय त्रास

रायगडच्या पायथ्याजवळ असणारी ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी व पाने या गावांना बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने खूप त्रास होत आहे.
रायगडच्या पायथ्याजवळील रस्ता खचल्याने; 'या' गावकऱ्यांना सोसावा लागतोय त्रास
रायगडच्या पायथ्याजवळील रस्ता खचल्याने; 'या' गावकऱ्यांना सोसावा लागतोय त्रासराजेश भोस्तेकर

रायगड: महाड तालुक्यापासून 40 किमी अंतरावरती असणाऱ्या रायगडच्या पायथ्याजवळ असणारी ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी व पाने या गावांकडे जाणारा रस्ता मागील काहीदिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांचा बाजारपेठ व महाड तालुक्याशी संपर्क तुटला असल्याचे मूळ पाने गावचे रहिवाशी व सध्या माणगाव स्थायिक झालेले येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर महादेव कनोजे यांनी ही माहिती दिली आहे.Villagers are suffering due to the erosion of the road near the foothills of Raigad

अत्यावश्यक गोष्टींचा गावकऱ्यांना पुरवठा- पालकमंत्री

पालकमंत्री आदिती तटकरेGuardian Minister Aditi Tatkare यांनी या गावांना भेट दिली असून गावातील ग्रामस्थांना अन्न, धान्याची किट देण्यात आले आहेत. रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी फोनवरुन दिली.

रायगडच्या पायथ्याजवळ असणारी वारंगी, वाघेरी व पाने या रस्त्यावर रस्ता खचला असल्याने या गावांचा महाडशी संपर्क तुटला आहे. या गावातील लोकांना महाड हि मोठी बाजारपेठ असून महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामानिमित्त येथील ग्रामस्थांना महाडला यावे लागते. या गावांतील लोकांची वाहतूक थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वरील गावांतील किरकोळ दुकानदारांचे देखील किराणा साहित्य संपले आहे.या  गावात गेली 8 दिवस वीजElectricity नाही.

रायगडच्या पायथ्याजवळील रस्ता खचल्याने; 'या' गावकऱ्यांना सोसावा लागतोय त्रास
हृदयद्रावक! जन्मदात्रीवरच लेकाचा अत्याचार

मदतीचे आवाहन

लहान मुले अंधारात आहेत त्यामुळे वयस्कर, अपंग, विधवा, मोलमजुर या लोकांची परिस्थिती गंभीर व हलाखीची झाली आहे. तरी कोणाला मदत करायची असेल तर या गावातील लोकांना देखील मदतीची गरज आहे.Appeal for help हि गावे पूर्वपरिस्थितीमुळे व खचलेल्या रस्त्याच्या समस्यांमुळे संकटात असून दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना, ट्रस्ट यांनी एक हात मदतीचा देऊन या गावांना सहकार्य करावे असे आवाहन माजी ग्रामपंचायत सदस्य कनोजे यांनी केले आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com