गावाचा रस्ता हिरवणाऱ्या प्रशासन आणि कंपन्यांविरोधात बैलगाडी मोर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामधील नायगाव या ठिकाणी काही वर्षे झाले गावाच्या रस्त्याचा विषय हा चर्चेचा विषय ठरला आहे.
गावाचा रस्ता हिरवणाऱ्या प्रशासन आणि कंपन्यांविरोधात बैलगाडी मोर्चा
गावाचा रस्ता हिरवणाऱ्या प्रशासन आणि कंपन्यांविरोधात बैलगाडी मोर्चासंजय तुमराम

नायगाव : चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील वरोरा Warora तालुक्यामधील नायगाव Naigaon या ठिकाणी काही वर्षे झाले गावाच्या रस्त्याचा विषय हा चर्चेचा विषय ठरला आहे. या गावालगत वर्धा पॉवर Wardha Power आणि जी. एम. आर G. M. R. अशा 2 औष्णिक वीजनिर्मिती कंपन्या आहेत. या कंपन्या स्थापित होताना गावाला Village दत्तक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या गावात विकासाच्या नावावर अजून भोपळाच आहे. या कंपन्यांनी गावाचा रस्ता तेवढा नाहीसा केला आहे.

हे देखील पहा-

याविरोधात शेतकरी Farmers आणि विद्यार्थी Students आज थेट वरोरा तहसील कार्यालयावर बैलगाड्यांसह Bullock cart पोहचले व ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. या गावात प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणातील मातब्बर येऊन पाहणी करून जातात. मात्र, मिळते केवळ आश्वासन. नायगाव ते वरोरा या कच्च्या रोडवर ४०- ५० टन कोळसा भरलेल्या ट्रकची जड वाहतूक केली जाते.

यामुळे कसातरी सुरु असलेला हा रस्ता शाळकरी मुलांसाठी देखील बंद करण्यात आला आहे. पर्यायाने बस देखील बंद झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य पोहचविणे अवघड झाले आहे. अत्यंत चाळण झालेल्या या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील अधिक वाढले आहे. सोयाबीन पिकाची काढणी काही दिवसात सुरू होणार आहे.

गावाचा रस्ता हिरवणाऱ्या प्रशासन आणि कंपन्यांविरोधात बैलगाडी मोर्चा
BREAKING Sangali | बैलगाडी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर

मात्र, शेतकऱ्यांना जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते पीक crop तिथेच सडणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. या सगळ्या बाबीचे निवेदन देण्यासाठी विद्यार्थी आणि शेतकरी थेट तहसीलदारांच्या दारात पोचल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. तहसीलदारांनी संवेदनशीलता दाखवत मागण्या मान्य करत  कोळशाची जड वाहतूक त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्यातच रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी देखील आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com