आंब्याच्या झाडाची दहशत; 'या' गावात झाड लावणारी व्यक्ती होते आंधळी, गावकऱ्यांचा समज

महाराष्ट्रातील अंधश्रद्धेची पायामुळे संपवण्यासाठी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या जिवाचं बलिदान दिलं.
BEED
BEED SAAM TV
Published On

बीड: महाराष्ट्रातील अंधश्रद्धेची पायामुळे संपवण्यासाठी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या जिवाचं बलिदान दिलं. मात्र आजही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असणाऱ्या या महाराष्ट्रात अंधश्रद्धेची हद्दचं पार केल्याचं समोर आलंय. आंब्याची लागवड केल्याने चक्क माणसं आंधळी होतात, डोळ्यात टिक पडते, असा समाज गावकऱ्यांमध्ये आहे. पाहुयात अंधश्रद्धेपायी पाच पिढ्यांपासून गावात आंब्याचं झाडं न लावणारं कोणतं आहे ते गाव?

बीड तालुक्यातील आंबेसावळी गाव.. या गावांमध्ये अंबाबाई व सावळेश्वर मंदिर आहे. याच नावावरून आंबेसावळी असं गावाचं नाव पडलेलं आहे. अशी या गावाची अख्यायिका आहे. या गावांमध्ये आंब्याचे झाड लागवड केल्यानंतर , ज्या व्यक्तीने लागवड केले आहे, ती व्यक्ती आंधळी होते किंवा त्याच्या डोळ्यांमध्ये टिक पडली जाते किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीचा त्रास होतो. त्याचबरोबर गावातील जो व्यक्ती लागवड करतो त्याचा वंश देखील बुडतो. असंही या गावातील मंडळीकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे या गावात गेल्या अनेक वर्षापासून कोणताही व्यक्ती आंब्याची लागवड करत नाही. तर ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा ? मात्र याच गावातील अनेक लोक सांगतात की ज्या लोकांनी आंब्याची झाडे लावली, त्यांना मोठा प्रमाणात त्रास झाला आहे.

BEED
राजेंचे काय होणार? राजे माघार घेणार की आणखी..., सगळेच टेंशन; वाचा कुटुंबियांची भावना

याविषयी गावातील मंडळी सांगतायत, की आम्हाला पण वाटते शेतामध्ये आंब्याचे झाड लावावे. कारण दुसऱ्याच्या शेतामध्ये आंबे पाहिल्यानंतर आमच्याही तोंडाला पाणी सुटते. कधी हिरव्या कैऱ्या खाव्या वाटतात. पण आमच्या गावामध्ये एक पुरातन काळातील अंबाबाईचे मंदिर आहे. आमच्या येथे आमचे पणजोबा, आजोबा, वडील यांनी कोणीही आंब्याचे झाड लावलेले नाही. ज्या कोणी व्यक्तीने झाड लावले, त्या व्यक्तीच्या घरातील कुणी ना कुणी आंधळे झालं आहे. कुणाच्या डोळ्यात टिक पडली आहे, बाहेरून पाहिलं तर अंबाबाईचं काढून देतात. आणि आम्हाला आमच्या शेतात असलेलं आंब्याचं झाड उपटायला सांगतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा आमच्या गावांमध्ये आहे. आमच्या तरुण पिढीला देखील वाटतं की आंब्याचं झाड लावावं, पण मनामध्ये जी भीती आहे, ती अजूनही कायम आहे.

आमच्या गावामध्ये दोन्ही देवांच्या यात्रा मोठ्या प्रमाणात भरतात, आम्ही दोन्ही देवाला मानतो. मात्र कोणीही आंब्याचा झाड लावण्याचे धाडस करत नाही. त्यामुळं आमच्या आंबेसावळी शिवारामध्ये आंब्याचे झाडं नाही, जी जुने दोन झाडे आहेत, तीच झाडे आजही आहेत. ज्यांच्याकडे ही झाडे आहेत त्यांना पण अडचण आलेली आहे. एका व्यक्तीच्या डोळ्यामध्ये ठीक पडली आहे तर दुसऱा आंधळा झाला होता. पण ज्या वेळेस देवाचं पाहिलं त्यावेळेस त्यांना अंबाबाईचं काढून दिलं होतं आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये असलेलं आंब्याचं झाड उपटून टाका असं सांगितलं... आम्हाला पण असं वाटलं होतं की आम्ही आंब्याचे झाड लावावं, आमच्या घरची वरिष्ठ मंडळी लावून देत नाही.

BEED
नाशकात इंधन टंचाई, ३० टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे बोर्ड

ग्रामस्थ रामेश्वर गुंदेकर यांच्या सारखीच स्थिती गावातील जवळपास सर्वच गावकर्‍यांची आहे. सर्वांनाच वाटते की आपण आंब्याचे झाड लावावं. मात्र गेल्या पाच पिढ्यांपासून या गावांमध्ये आंबा लावला तर आंधळेपणा येतो , टिक पडते असा समज आहे. त्यामुळे या अंधश्रद्धेच्या भूतापाई आंबा लावण्याचे धाडस गावातील तरूण अथवा वृद्ध करत नाही. त्यामुळे आजही या गावात आंब्याची भीती मात्र कायम आहे

तर गावात असणारे आंब्याचे दोन झाडे ते फक्त माझ्याच शेतामध्ये आहेत. शिवारात कुठेही आंब्याचं झाड तुम्हाला दिसणार नाही. आम्ही ते शेत विकत घेतलेलं आहे. ज्यांनी लावले होते त्यांना त्याचा त्रास झाला आहे. आम्हालाही वाटतं ही अंधश्रद्धा असेल मात्र हिंमत होत नाही झाड लावायची.नैसर्गिकरीत्या जी झाडे उगवली आहेत, त्याचा सुद्धा लोकांना त्याचा त्रास झाला आहे. असं रामनाथ गुंदेकर सांगतायत.

तर याविषयी सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे म्हणाले, की या अंधश्रद्धेतून गावकऱ्यांनी बाहेर पडावे. कारण हे एकविसावे शतक आहे आणि जग खूप लांब जात आहे आणि आपण जर या रुढी परंपरांमध्ये अडकून राहिलो तर आपला जो विकास होणार आहे तो होणार नाही. जर या अंधश्रद्धेतून बाहेर पडलं तरच आपली मुलं महिला सुशिक्षित होतील आणि आपला समाज सशक्त बनेल...

दरम्यान आंब्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र या आंबेसावळी गावात चक्क गेल्या पाच पिढ्यांपासून आंब्याची लागवड केली जात नाही. आंबा लावला तर कुटुंबातील व्यक्ती आंधळी होते. असा समज या गावकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे या गावकर्यांमधील समज, गैरसमज, अंधश्रद्धा बाहेर काढून, गावातील आंब्याची दहशत संपवण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com