Palghar: भर पावसात पूल गेला वाहून, गावकऱ्यांनी केला अनोखा जुगाड (पाहा Video)

VIkramgad Villagers Make Bamboo Bridge Video : विक्रमगडमधील मलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील बुरुज पाडा आणि दिवेपाडाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्यावरील पूलाचा काही भाग पूराच्या पाण्यात वाहून गेला.
VIkramgad Villagers Make Bamboo Bridge
VIkramgad Villagers Make Bamboo Bridgeरुपेश पाटील
Published On

पालघर: पालघर (Palghar) जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाच्या पुरात गावा-खेड्यातील कच्चे बांधकाम वाहून गेले. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमधील मलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील बुरुज पाडा आणि दिवेपाडाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्यावरील पूलाचा (Bridge) काही भाग पूराच्या पाण्यात वाहून गेला. हा पूल मातीच्या साहाय्याने तयार केला होता, त्यामुळे पूराच्या पाण्यात त्याचा टिकाव लागला नाही. मात्र यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जायला अडचणी येत होत्या, यावर गावकऱ्यांनी जुगाड (Jugad) शोधत तात्पुरता पूल बनवला आणि आता गावातल्या शाळकरी मुलांसह गावकरी हेदेखील याच पूलावरुन ये-जा करतायत. (Palghar Jugad News)

हे देखील पाहा -

दोन गावांना जोडणारा हा पूल माती भराव करून तयार केलेला असल्याने पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. बुरुज पाडा ते दिवेपाडा हा रस्ता मागील वर्षी रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केला होता. मात्र या रस्त्यावर तयार केलेला पाईप आणि मातीच्या साहाय्याने तयार केलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. माती भराव वाहून गेल्यावर धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे या पुलाखाली टाकण्यात आलेल्या पाईपला रिंगाच जोडण्यात आल्या नाहीत, त्यामुळे हा या पूलाचा काही भाग वाहून गेला.

विक्रमगड तालुक्यात गेल्या आठवड्यात धुवांधार मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहु लागले. तालुक्यातील देहर्जे, तांबाडी, पिंजाळ नद्या तसेच इतर नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पुल आणि मोऱ्या उलटल्या त्यामुळे अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता.

VIkramgad Villagers Make Bamboo Bridge
No Parking : कमाल आहे...बाईकसकट चालकालाही क्रेननं उचललं (व्हिडिओ पाहा)

गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना गावाबाहेर पडण्यास होणारी अडचण लक्षात घेता गावकऱ्यांनीच यावर देशी जुगाड करत, पुलाच्या जागी बांबूच्या साहाय्याने पूल तयार केला आहे. याच बांबूपासून तयार केलेल्या पुलावरून सध्या गावकरी आणि विद्यार्थी ये जा करत आहेत. प्रशासन मदत कधी देईल, पक्का पूल केव्हा बनेल यावर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी जुगाड करत तात्पुरती सोय केलेली आहे, मात्र असं असलं तरी प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर पावलं उचलत पूल पुन्हा बांधून देणे गरजेचे आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com