राज्य सरकार १५२९ अॅम्बुलन्स खरेदी करणार आहे, त्यावरून विधान परिषेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कार्डियाकवर काळजी घेण्याची सुविधा असलेली रुग्णवाहिका ५० लाखांच्या आसपास आहे.सनदी अधिकाऱ्यांनी ४५ दिवस टेंडरची मुदत असताना त्यात बदल करून १० दिवस ठेवली. ३३ कोटी महिन्याचा खर्च असताना आता ती ७४ कोटी इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदाराला आता पुढची १० वर्षे तब्बल ७४ कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला असून अॅम्बुलन्समधून पैसे खाण्याचा प्रकार महायुतीत सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पहिलं टेंडर परस्पर रद्द करण्यात आलं. आधीच्या सरकारच्या काळात ४१ दिवस मुदत असायची आता त्यात बदल करण्यात आले आहेत. सबंधित ठेकेदार सेवा बरोबर देतो की नाही? चालक बरोबर आहेत की नाही? याची कुठलीही खातरजमा न करता सरसकट अट ठेवलेली नाही. क्षमता आणि गुणवत्ता न तपासता ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे.वर्षाला आठ टक्के खर्चवाढ का देण्यात आली. एका मंत्र्यांचा आणि त्याच्या नातेवाईकाची यामध्ये समावेश आहे तेही आम्ही समोर आणू असा गौप्यस्फोट त्यांनी केला असून या घोटाळ्याच्या उच्च स्तरीय चौकशीची मागणी आम्ही त्यांनी केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तलाठी भरती संदर्भात आंदोलन सुरू असून या आंदोलनातील काही मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहे. तलाठी भरतीच्या परिक्षेत २०० पैकी २१४ गुण मिळतात कसे ? हाच पुरावा मोठा पुरावा आहे. मंत्र्यांच्या मतदारसंघातील मुलांना पुढे आणण्यासाठी पैसे देऊन काम होत आहे. याची एसआयटी च्या माध्यमातून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.