दिलेला शब्द पाळला; शेतकऱ्यांसाठी 'एवढा' निधी मंजूर केल्याची विजय वडेट्टीवारांची माहिती

शेतकऱयांसाठी 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
दिलेला शब्द पाळला; शेतकऱ्यांसाठी एवढा निधी मंजूर केल्याची विजय वडेट्टीवारांची माहिती
दिलेला शब्द पाळला; शेतकऱ्यांसाठी एवढा निधी मंजूर केल्याची विजय वडेट्टीवारांची माहितीSaamTV
Published On

रश्मी पुराणीक -

मुंबई : गारपीट आणि अतिवृष्टीमुळे Heavy Rain मार्च, एप्रिल व मे 2021 या कालावधीत कोकण, नाशिक, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान Loss Of Agriculture झाले होते. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय Govermet Decision मंजूर झाला आहे. हा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांच्या पुढाकाराने मंजूर झाल्याचे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने PR Office प्रसिद्ध केले आहे.(Vijay Vadettiwar informed that fund has been sanctioned for farmers)

हे देखील पहा -

पिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱयांसाठी 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. अशाप्रकारे शेतकऱयांना भरीव मदत करून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वचनपूर्ती केली आहे असं या पत्रकात मध्ये म्हटंल आहे.

गारपीट व अवेळी पावसामुळे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे- फळबागांचे मोठं नुकसान होते या परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना वडेट्टीवार यांनी शेतकऱयांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,Uddhav Thackeray उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याशी चर्चा करून शेतकऱयांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला असल्याच देखील या पत्रात सांगितलं आहे.

दिलेला शब्द पाळला; शेतकऱ्यांसाठी एवढा निधी मंजूर केल्याची विजय वडेट्टीवारांची माहिती
मनीषने देशहिताच काम केलंय; कृपया राजकारण करू नका - भानुशाली कुटुंबीयांच आवाहन

शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानासाठी मदत करण्याकरिता केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. गारपीट व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी कोकण विभागासाठी 29 लाख 30 हजार रुपये, पुणे विभागासाठी 3 कोटी 16 लाख 75 हजार रुपये, नाशिक विभागासाठी 59 कोटी 36 लाख 34 हजार रुपये, औरंगाबाद विभागासाठी 15 कोटी 51 लाख 54 हजार रुपये, अमरावती विभागासाठी 38 कोटी 87 लाख 56 हजार रुपये, नागपूर विभागासाठी 5 कोटी 4 लाख 81 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com