Maharashtra Marathi News Live Updates: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून १७ ऑगस्टपर्यंत मुदत

Maharashtra Breaking Marathi News Live Updates: आज दिनांक महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी.... राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे. त्यामुळे आज सभागृहात मोठे निर्णय आणि घोषणा होण्याची शक्यता आहे.
Vidhan Sabha Pavsali Adhiveshan Live Updates maharashtra breaking news today 4th august 2023 latest marathi news Maharashtra Rain Updates
Vidhan Sabha Pavsali Adhiveshan Live Updates maharashtra breaking news today 4th august 2023 latest marathi news Maharashtra Rain UpdatesSaam TV

संभाजी भिडेंच्या पुण्यातील कार्यक्रमाला भीम आर्मीचा विरोध

भीम आर्मी उद्या संभाजी भिडे यांच्या विरोधात पुण्यात करणार आंदोलन

कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, भीम आर्मीचे पुणे पोलिसांना पत्र

उद्या पुण्यातील बालगंधर्व चौकात संभाजी भिडे यांचे समर्थक करणार आहेत संभाजी भिडे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक

संभाजी भिडे यांच्या समर्थकांच्या याच कार्यक्रमाला भीम आर्मीने केला विरोध

जर पुण्यात संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक आणि समर्थन आंदोलन केलं तर भीम आर्मी त्यांच्याविरोधात करणार जोरदार आंदोलन

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना उत्तर देण्यासाठी EC कडून १७ ऑगस्टपर्यंत मुदत

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उत्तर देणासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुदत

१७ तारखेपर्यंत आपलं म्हणणं सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिला आहे वेळ

वेळेत उत्तर सादर करणार की वेळ वाढवून मागणार हे पाहणं महत्वाचं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा वाद निवडणूक आयोगात

अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केलाय

विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत - एकनाथ शिंदे

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर

विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

विरोधकांचा आत्मविश्वास डगमगलेला दिसल्याचेही शिंदे म्हणाले.

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा कोर्टातच राजीनामा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव यांनी भर कोर्टातच राजीनामा देण्याची केली घोषणा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाचे कामकाज नियमित वेळेपूर्वी आटोपत न्यायालयात न्यायमूर्ती देव यांनी केली राजीनाम्याची घोषणा

राजीनामा देण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

निवृत्तीला एक वर्ष शिल्लक असताना अचानक दिला राजीनामा

ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये NCC विद्यार्थ्यांना मारहाण, पोलिसांची मोठी कारवाई

ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधील एनसीसी विद्यार्थी मारहाण प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अद्याप कोणीही तक्रार केली नसल्याने पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या कलम 323 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तक्रार आल्यानंतर चौकशी करून याबाबत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केलं.

जळगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सकल मराठा समाजाचा मोर्चा

जळगावमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी सकल मराठा समाजाचा मोर्चा

अत्याचाराच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यातील तरुणींसह महिला उतरल्या रस्त्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पीडित कुटुंबीयांना कुटुंबीयांशी फोनवर संवाद

आरोपीला कठोर शिक्षा देण्याची पीडितेच्या आईवडिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आरोपीवर कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे पीडितेच्या कुटुंबीयांना आश्वासन

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील भाम धरण १०० टक्के भरले

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भाम धरण १०० टक्के भरले

भावलीनंतर भाम धरण देखील १०० टक्के भरले

धरणाच्या सांडव्यावरून ओसंडून वाहतेय पाणी

इगतपुरी परिसरातील धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ

मुंबईतील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकाजवळ इमारतीला भीषण आग

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकाजवळील एका इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली. जेपी ऑर्चिड या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बारसूतील आंदोलकांना बेंगळुरूतून फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

रिफायनरी मुद्द्यावरुन फडणवीसांचा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विधानपरिषदेत गंभीर आरोप

'बारसूतील आंदोलकांना बंगळुरुतून फंडिंग'

'आपण उशीर केल्यानं एक कंपनी पाकिस्तानात गेली

'विरोध करणाऱ्यांशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न'

आंदोलनात तेच तेच लोक दिसतात - फडणवीस

वारकऱ्यांनी बॅरिकेट तोडलं अन् पोलिसांना तुडवून गेले... - देवेंद्र फडणवीस

वारकर्यावर आम्ही लाटीचार्ज केला नाही. मागच्या वर्षी मंदीरात प्रवेश दिला त्यावेळी महिलांच्या अंगावर महिला पडल्या ते पून्हा होऊ नये यासाठी नियोजनावर बैठक झाली. असं फडणवीसांनी सभागृहात म्हटलं आहे.

वारकऱ्यांवरील लाठीचार्जवर पुढे ते म्हणाले की, ५६ दिंड्याना ७५ पास द्यायचे. पहिलं त्यांना दर्शन त्यांना दिल्यानंतर इतरांना दर्शन द्यायचं हे ठरलं होतं. त्या ठिकाणी काही वारकरी आले त्यांनी दर्शनाचा हट्ट धरला अनेकांनी त्यांना थांबण्यास विनंती केली. त्यांनी बॅरिकेट तोडलं आणि पोलिसांना तुडवून ते पुढे गेले. पण पून्हा पोलिसानी त्यांना थांबवलं सर्व सीसीटिव्ही तपासले कुणालाही लाठीचार्ज झाला नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

६६ तासांच्या अथक प्रयत्नांतर एका मजुराचा मृतदेह सापडला

इंदापूर तालुक्यातील विहीर दुर्घटनेतील मजुरांचा सलग चौथ्या दिवशी शोध सुरू आहे. अशात ६६ तासांच्या अथक प्रयत्नांतर एका मजुराचा मृतदेह सापडलाय. दोन ते तीन तासांत शोधकार्य पूर्ण होईल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

नितीन देसाई यांच्या मृत्यूची सखोल चौकशी होणार: अजित पवार

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या जे.जे रुग्णालयात जाऊन नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ज्या क्लिप मिळाल्या आहेत, त्याचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. कायद्यातील नियमाप्रमाणे दोषींवर कारवाई होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विहिरीचा कठडा कोसळून ४ मजूर ढिगाऱ्याखाली दबले; ४८ तास उलटूनही शोध लागेना

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक भयानक घटना घडली. म्हसोबावाडीत शेतातील विहिरीचे काम करताना कठडा आणि मुरुम कोसळल्याने ४ मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. विहिरीत गाडल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) काम सुरू केले आहे.

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी (वय ३०), परशुराम चव्हाण (वय ३०), मनोज मारुती चव्हाण (वय ४०) अशी मजुरांची नावे आहेत. शोधकार्य सुरू होऊन तब्बल ४८ तास उलटले, तरीही या मजूरांचा अद्यापही शोध लागलेला नाही. आज शोधकार्याचा तिसरा दिवस असून रात्री विहिरीत रॅम्प बनवण्यासाठी काम सुरू होते.

Maharashtra Marathi News Live Updates: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार

आज दिनांक महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी.... राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे. त्यामुळे आज सभागृहात मोठे निर्णय आणि घोषणा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी अमित शहा पुण्यात येणार असून सहकार विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार.

लोकसभेत दिल्ली सेवा बिल मंजूर करण्यात आलं आहे. आज हे बिल राज्यसभेत मांडलं जाणार असल्याची शक्यता असून ते राज्यसभेत मंजूर होतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com