Maharashtra School Reopened: आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट; राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद
Maharashtra School Reopened: आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट; राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंदSaam TV

Maharashtra School Reopened: आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट; राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद

१ ली ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली होती.

मुंबई: राज्यात (Maharashtra) आजपासून बालवाडी (Kindergarten) ते इयत्ता १२ वी (Class XII) पर्यंतच्या शाळा सुरू झाले आहेत. दरम्यान राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या (Corona) रोजच वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये काहीशी भीती आहे. या चिंतेमुळे काही जिल्ह्यामध्ये शाळा आजपासून सुरू केली जाणार नाही. १ ली ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Government) घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यावेळी दिली होती. (Varsha Gaikwad Maharashtra School Reopened From Today)

शाळा (School) सुरू करण्याच्या संदर्भामध्ये एसओपी (मार्गदर्शक सूचना) दिले आहेत. त्याचे काटेकोर पालन करुन शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्याचे पालन करुन शाळा सुरू करण्यात आले आहेत. यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील काही आवश्यक सुचना पालकांना आणि शाळांना दिले आहेत. दरम्यान, राज्यात शाळा आज सोमवारपासून सुरू होणार आहेत.

हे देखील पहा-

कोरोना (Corona) महामारीच्या काळामध्ये तब्बल ७०० दिवस शाळा बंद होते. यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे, अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने यावेळी घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटते त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. सोमवारपासून शाळा सुरू होत असले तरी पुढची पावले कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. (Varsha Gaikwad Maharashtra School Reopened From Today)

मुंबईमध्ये (Mumbai) शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. मात्र, अनेक जिल्हा प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते १२ वीपर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे.

पुण्यामध्ये (Pune) शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. तर, नागपुरामध्ये २६ जानेवारीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये मात्र सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. नाशिक मधील १ ली ते १२ वीच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. तर शाळेत विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास परत एकदा शाळा बंद करण्यात येईल. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. ९ वी वी ते १२ वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त इयत्ता ९ वी ते १२ वीच्या ४२० शाळा सुरू होणार आहेत. ९ वी ते १२ वी च्या शाळांना मिळणारा प्रतिसाद बघून पहिल्या आठवड्यानंतर उर्वरित शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभाग घेणार आहे. शाळेचे कामकाज फक्त ३ तास चालणार आहे. प्रत्येक शाळेत वैद्यकीय कक्ष बंधनकारक करण्यात आले आहेत. (Varsha Gaikwad Maharashtra School Reopened From Today)

जालना (Jalna) जिल्ह्यामध्ये सोमवारपासून शहरी भागात ८ वी ते १२ वीपर्यंत तर ग्रामीण भागामधील १ ली ते १२ वी पर्यतचे वर्ग उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शाळा २४ जानेवारीपासून १ ली ते १२ वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत. या जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्याने वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुग राजन एस यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत. तर औरंगाबाद, बीड, नांदेडमध्ये फक्त १० वी, १२ वीच्या शाळा सुरू होणार आहेत.

Maharashtra School Reopened: आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट; राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद
Schools Reopen: शिक्षणमंत्री म्हणाल्या...चला मुलांनो चला!

शाळा सुरू करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास संमती देणार असे विद्यार्थी शाळेमध्ये येणार आहेत. शिक्षण कुणाचे देखील थांबू नये, असा प्रयत्न आहे, असेही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे. राज्यामध्ये आजपासून शाळा सुरु होत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सर्व पालकांना मुलांना शाळेत पाठवण्याची विनंती केली आहे. जगभरात शाळांचा अभ्यास केल्यानंतरच सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com