चक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण; भन्नाट विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा

लसवंत असेल तरचं व्हराडींना लग्नात प्रवेश
चक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण; भन्नाट विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा
चक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण; भन्नाट विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चाविनोद जिरे

विनोद जिरे

बीड : लसीकरणाचे (Vaccination) प्रबोधन व्हावे या साठी वेगवेगळ्या शक्कल प्रशासन लढवत असल्याचे आपण पाहिले असेल. मात्र बीडमध्ये (Beed) एका लग्न सोहळयात चक्क लस घेतली असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला जात आहे. लस नसेल तर लगेच लस टोचून घेतली जात आहे. यामुळे या विवाह सोहळ्याची भन्नाट चर्चा सुरू आहे. बीडचे माजी आमदार सुनील धांडे यांचे सुपुत्र आणि माजी सभापती नारायण परझने, यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात संयोजकांनी लसीची सक्ती केली.

हे देखील पहा-

या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने ॲम्बुलन्समध्ये लसीकरण केले जात आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या हस्ते या लग्न मंडपातील लसीकरणाचा शुभारंभ झाला. लसीकरनासाठी नागरिकपुढे येत नाहीत, म्हणून लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आम्ही हा उपक्रम घेत आहोत. असं मुलीचे वडील नारायण परझने यांनी सांगितले.

चक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण; भन्नाट विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा
तीनशेची थाळी अन् गंडा 90 हजारांचा; फेसबुकवरची जाहिरात पडली महागात !

ज्यांनी लस घेतली नाही सर्व वऱ्हाडी मंडळीं लस घ्यावं, असे आवाहन संयोजक मंडळीच्या वतीने केशव तांदळे यांनी केली. लग्न समारंभामध्ये लसीकरणाची जनजागृती व्हावी, यासाठी नारायण परझने आणि सुनील धांडे यांनी घेतलेल्या या उपक्रमामुळे, लसीकरणाचे मोठ्या प्रमाणात लोकांना देखील महत्त्व सांगण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन लस घ्यावी. अस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .सुरेश साबळे यांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com