तीनशेची थाळी अन् गंडा 90 हजारांचा; फेसबुकवरची जाहिरात पडली महागात !

औरंगाबादमध्ये फेसबुकवरील (Facebook) शाही भोज थाळीच्या जाहिरातीला भूलल्यामुळे एका व्यक्तीला तब्बल 90 हजारांचा गंडा बसल्याची घटना घडली आहे.
तीनशेची थाळी अन् गंडा 90 हजारांचा; फेसबुकवरची जाहिरात पडली महागात !
तीनशेची थाळी अन् गंडा 90 हजारांचा; फेसबुकवरची जाहिरात पडली महागात !Saam Tv

औरंगाबादः औरंगाबादमध्ये (Aurangabad) फेसबुकवरील (Facebook) शाही भोज थाळीच्या जाहिरातीला भूलल्यामुळे एका व्यक्तीला तब्बल 90 हजारांचा गंडा बसल्याची घटना घडली आहे. सोमवारी एमआयडीसी सिडको (CIDCO MIDC Aurangabad) पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर (September) महिन्यात फेसबुकवरील जाहिरात पाहून बाय ‘वन गेट टू फ्री’ (Buy One Get Two Free Offer) ची जाहिरात पाहून त्या अमिषाला संबंधित व्यक्तीला फसवण्यात आले होते. परंतु, आम्ही फेसबुकवर अश्या कोणत्याही प्रकारची जाहिरात करत नाही, असे औरंगाबादमधील भोज रेस्टॉरंटच्या मालकांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील पहा-

फेसबुकवर पाहिली ‘बाय वन गेट टू फ्री’ ची जाहिरात;

याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब ठोंबरे, हे नारेगाव येथील रहिवासी हे याप्रकरणी फिर्यादी आहेत. ते स्क्रॅपचा व्यवसाय करतात. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) चिकलठाणा एमआयडीसीतील शाखेत खाते आहे. त्यांनी 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घरी फेसबुक पाहत होते त्यादरम्यान, त्यांना ‘शाही भोज थाली’ची जाहिरात दिसली. जाहिरातीत बुकिंगसाठी मोबाइल क्रमांकही दिलेला होता. त्यावर त्यांनी फोन केला.

तीनशेची थाळी अन् गंडा 90 हजारांचा; फेसबुकवरची जाहिरात पडली महागात !
कल्याण गुन्हे शाखेकडून कारवाई; रेकॉर्डवरील तडीपार गुंड जेरबंद !

त्यांनी ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी क्रेडिट कार्डची सर्व माहिती मागून घेतली. आणि ठोंबरे यांनी ती दिली सुद्धा. मोबाइलवर आलेला ओटीपीदेखील (OTP) सांगितला. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डमधून 49 हजार 490 रुपये असे दोन वेळा काढून घेतले गेले. सर्व फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर, या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. तब्बल दोन महिन्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस निरीक्षक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com