औरंगाबादमध्ये ३ इडियट्सचा अनोखा जुगाड

मोबाईल डिव्हाईसच्या सहाय्याने चालणारे ईटी कार्डीओप्लॉट १२ इसीजी मशीन केले विकसित
औरंगाबादमध्ये ३ इडियट्सचा अनोखा जुगाड
औरंगाबादमध्ये ३ इडियट्सचा अनोखा जुगाड
Published On

औरंगाबाद - तीन तरूणांनी एकत्र येऊन मोबाईल डिव्हाईसच्या Mobile Device सहाय्याने चालणारे ईटी कार्डीओप्लॉट १२ इसीजी मशीन विकसित केले आहे. या इसीजी ECG Machine मशीनमुळे वेळ तर वाचणार आहे शिवाय काही वेळात ईसीजी रिपोर्ट पीडीएफ स्वरूपात मिळत असल्याने कुठेही पाठवता येणार आहे.

हे छोटसं ईसीजी मशीन तुमच्या हृदयाची स्थिती अवघ्या काही सेकंदात सांगणार आहे आणि तुमच्या हृदयाच्या स्थितीचा रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर अवघ्या काही मिनिटात पोहोचेल. एवढेच नाही तर आता ईसीजी काढायला रुग्णालयातही जायची गरज नाही. घर बसल्या तुम्ही ईसीजी करून रिपोर्ट पाहू शकता. शिवाय आपल्या हव्या त्या डॉक्टरला पाठवून पुढील सल्ला घेऊ शकता. या मशीनची निर्मिती औरंगाबादमधील प्रतीक तोडकर, तन्वी निकाळजे आणि मिहीर गायकवाड या नव उद्योजकांनी केलीय. या नव्या मशीनचं नाव आहे, ईटी कॉर्डीओप्लॉट.

हे देखील पहा -

हृदयासंबंधी तपासणीसाठी, ईसीजी करण्यासाठी नेहमी प्रत्येकाला हॉस्पिलट गाठावे लागते. विजेवर चालणारी मशीन ग्रामीण भागात बऱ्याच वेळी वीज नसल्यानं कामाचं ठरतं नाहीत, त्यात तज्ञ डॉक्टरला पाठवायचं म्हणजे फोटो काढून पाठवावे लागते, त्यातही तपासण्यात मर्यादा येतात. यावर तोडगा म्हणून या संशोधकांनी हे नवीन ईसीजी मशीन बनवले आहे. मोबाईल सारखंच हे मशीन आहे, याला मोबाईल कनेक्ट करता येतो. त्यातून तुमचे रिडींग मोबाईलवर रेकॉर्ड होते आणि डॉक्टरला पाठवण्यासाठी पीडीएफ फॉरमेट मध्ये रिपोर्टही मिळतो.

औरंगाबादमध्ये ३ इडियट्सचा अनोखा जुगाड
पुण्यात क्रीडांगणाचा बळी देण्याचा घाट ?

गेली वर्षभर याच्या ट्रायल सुरु आहेत. त्यात चौथ्यांदा हे मशीन आता ट्रायलमध्ये पास झालंय. आणि आता हे वापराकरीता सज्ज आहे. किंमतही कमी, कुठंही वापरता येईल असं हे मशीन आहे. जिथे जिथे दळणवळणाची साधने कमी आहेत, अशा ग्रामिण आणि दुर्गम भागात हे अधिक उपयोगी ठरणार आहे.

पेपरलेस रिपोर्ट यात मिळतील ते पाठवायला सोपे आहेत. प्रिंटर आणि असल्या तत्सम कुठल्याही गोष्टींची याला गरज नाही. कुठंलही संशोधन लोकोपयोगी असलं की त्याचा उपयोग होतो, हे मशीन सुद्धा आता याच प्रकाराच मोडतं. रुग्णांसाठी हे एक छोटेखानी वरदानच असायला हवे त्यात आता पारंपरिक ईसीजी मशीन पेक्षा हे स्वस्त असल्याने सगळ्यांनाच याचा फायदा होईल यात काही शंका नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com