काँग्रेसच्या जोडो यात्रेत तुकडे तुकडे गँगचं कनेक्शन; अनुराग ठाकूर यांची सडकून टीका

'काँग्रेसच्या जोडो यात्रेत तुकडे तुकडे गँगचे लोक सामील झाले आहेत, अशा शब्दात मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली आहे.
anurag thakur news
anurag thakur news saam tv

Anurag Thakur News : काँग्रेस पक्षाने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' आयोजन केले आहे. ७ सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या यात्रेचा चौथा दिवस आहे. या यात्रेत अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सामील झाले आहेत. काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'वर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी निशाणा साधला आहे. 'काँग्रेसच्या जोडो यात्रेत तुकडे तुकडे गँगचे लोक सामील झाले आहेत, अशा शब्दात मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली आहे.

anurag thakur news
'असं' झाल्यास भाजपचं देशपातळीवर मोठं नुकसान होईल, भाजप-मनसे युतीबाबत आठवले म्हणाले...

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. आज, रविवारी मंत्री ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री ठाकूर यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर जोरदार टीका केली.

'जे भारत सोडण्यावर जास्त विश्वास ठेवतात, ते भारत जोडण्यावर विश्वास का ठेवतील ? पार्टी त्यांना शोधत असते, संसदेच्या वेळी ते भेटत नाही. त्यांची यात्रा दोन दिवसातच पडली आहे. भारत एक मजबूत राष्ट्र आहे. सशक्त भारत, स्वस्थ भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बनत आहे. मात्र, काही लोक आजही भारत जोडण्याची गोष्ट करतात. ते कुठल्या जगात राहतात माहित नाही. त्यांना इतिहासाची थोडी माहिती असली पाहिजे. भारत हा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काय प्रगती करत आहे, हे त्यांनी पाहिले पाहिजे. पण काही काँग्रेसचे नेते हे आपले डोळे बंद करून बसले आहेत'.

'माझा राहुल गांधी आणि सोनिया गांधींना एक प्रश्न आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहे. त्यांच्यात तुकडे तुकडे गॅंग सामील झाले आहे. जेएनयू विद्यापीठाबाहेर जे लोक कधी पोस्टर लावत फिरायचे की भारत तेरे तुकडे होंगे हजार, इन्शा अल्ला इन्शा अल्लाची घोषणाबाजी करत होते. तेच लोक आज राहुल गांधी यांच्यासोबत त्यांच्या यात्रेचा एक भाग आहे', असेही ठाकूर म्हणाले.

anurag thakur news
दादरमध्येच शिंदे-ठाकरे आमने सामने; सेना भवन उभारण्याबाबत शिंदे गटाचं ठरलं

'तेच लोक जेएनयूमध्ये भारत तोडण्याची योजना आखायचे आणि रात्री त्यांना राहुल गांधी भेटायला जात होते. मी त्यावेळेलाही संसदेत विचारणा केली होती की, राहुल हे देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांसोबत आहे की देश वाचवणाऱ्या बरोबर व वाढवणाऱ्या बरोबर आहेत. तो चेहरा आता समोर आला आहे. तेच तुकडे तुकडे गँगचे लोक त्यांच्या यात्रेत सामील आहेत, असे ठाकूर पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com