दादरमध्येच शिंदे-ठाकरे आमने सामने; सेना भवन उभारण्याबाबत शिंदे गटाचं ठरलं

शिंदे गटाने दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याचे ठरविले आहे.
shinde group news
shinde group news saam tv

Eknath Shinde News : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. शिंदे गटाने शिवसेना (Shivsena) पक्षावर आणि धनुष्य बाणावर देखील दावा केला आहे. सदर वाद कोर्टात पोहोचला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाने दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याचे ठरविले आहे.

shinde group news
Sada Sarvankar : सदा सरवणकरांच्या अडचणीत वाढ होणार? सवणकरांवर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल

शिंदे गटाकडून प्रति सेनाभवन उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू होता. अखेर शिंदे गट दादरमध्येच सेना भवन उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. वास्तू सेंटर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शिंदे गट सेनाभवन उभारणार आहे. शिवसेनाभवनाच्या हाकेच्या अंतरावर शिंदे गटाचे सेनाभवन उभारण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच शिंदे गटाकडून सेनाभवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे नेमकं शिंदे गट प्रति सेनाभवनाचे केव्हा उद्घाटन करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सेना-शिंदे गटाचा वाद चिघळला; सदा सरवणकरांचे दादरमधील बॅनर फाडले

दरम्यान, शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील धुसफूस आता चांगलीच वाढू लागली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील वाद टोकाला गेल्याचं दिसून येतं आहे. काल रात्री देखील मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. त्यानंतर आज, रविवारी दुपारच्या दादर परिसरातील आमदार सदा सरवणकर यांच्या दादर येथील कार्यालयावर काही लोकांनी दगडफेक केली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाबाहेरील बॅनर देखील फाडण्यात आले आहेत. तसेच सदा सरवणकर यांचा पुत्र समाधान सदा सरवणकर यांचाही बॅनर फाडण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com