वाशिम : वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे परिसरात 12 सप्टेंबरला बंदुकीच्या गोळ्या झाडून, एका इसमाची हत्या करून, नग्न अवस्थेत शेतात फेकले होते. हत्येची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी मृत व्यक्तीचे ओळख पटविल्यानंतर मयत माधव पवार नागपूरचा असल्याचं निष्पन्न झाले आहे.
हे देखील पहा-
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी तपासाचे चक्रे फिरवीत शुभम कान्हारकर, विकल्प मोहोड, व्यंकटेश भगत या सर्वाना नागपूर या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. सदर हत्याकांड आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडल्याचे, दिसून येत आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव करत आहेत.
नागपुरातून अपहरण करून मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे शेतशिवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेला माधव पवार आणि आरोपी निशीद वासनिक यांचा नागपूर या ठिकाणी बिट कॉईन चा व्यवसाय होता. यामध्ये निशीद वासनिक वर नागपूर मध्ये विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारात वाद निर्माण झाला असून, मयत माधव पवार यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये सर्व व्यवहाराची माहिती असल्याने त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे. ३ पुरुष आरोपी आणि १ महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर यामध्ये अजून ३ आरोपी फरार असून, याचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान लवकरच त्यांचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.