गद्दारांशी युती नाहीच, अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे घेतली. मात्र या घटनेला अवघा आठवडा उलटत नाही तोच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी चमत्कारासारखीच घटना घडलीय.. शिंदेसेना आणि ठाकरेसेना चाकणमध्ये आपापसातील मतभेद बाजूला ठेवत एकत्र आलीय..
ही दृश्य आहेत चाकणमधील शिंदेसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनिषा गोरे यांचा अर्ज दाखल करतानाची... याच फोटोत ठाकरेसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदेसेनेचे आमदार शरद सोनवणे एकत्र आलेत... त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय..त्यातच दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झालीय..
खरंतर ठाकरे आणि शिंदे यांचं विळ्या भोपळ्याचं नातंय.. शिवसेना फुटीनंतर दोन्हीही नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत.. त्यातच आता कणकवलीतही वैभव नाईक आणि राजन तेलींनी शहर विकास आघाडी स्थापन केली.... मात्र त्याला ठाकरेंनी विरोध केलाय... त्यापार्श्वभुमीवर ठाकरेंचा आदेश धुडकावून स्थानिक आमदार बाबाजी काळेंनी चाकणध्ये मनीषा गोरेंना पाठींबा देण्याचा निर्णय घेतलाय की दोन्ही पक्षातील वैर फक्त दाखवण्यासाठी आहे? असाच प्रश्न उपस्थित होतोय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.