Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर

ARUN GAWLI RELEASED AFTER 18 YEARS: कुख्यात गुंड अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर आज त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर आल्यानंतरचा अरुण गवळीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर
ARUN GAWLI RELEASED AFTER 18 YEARSSaam Tv
Published On

Summary -

  • सुप्रीम कोर्टाने अरुण गवळीला १८ वर्षांनंतर जामीन मंजूर केला.

  • नागपूर मध्यवर्ती कारागृहातून गवळीची सुटका झाली.

  • २००७ मध्ये शिवसेना नगरसेवकाच्या हत्येत जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

  • वाढते वय आणि तुरुंगवासाचा कालावधी लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन दिला.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. मागच्या गेटने पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळीची सुटका केली. अरुण गवळीची तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज अरुण गवळीची तुरूंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे अरुण गवळीचे व्हिडीओ समोर आले आहेत.

मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. नागपूर कारागृहामध्ये अरुण गवळी शिक्षा भोगत होता. या प्रकरणात अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली.

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर
#shorts : Arun Gawli News : दगडी चाळीतील देवीच्या विसर्जन मिरवणुकीत अरुण गवळी स्वतः उपस्थित...

नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात गेल्या १८ वर्षांपासून अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. अरुण गवळीने दीर्घ तुरुंगवास आणि वाढते वय लक्षात घेऊन न्यायालयाकडे जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. अरुण गवळीचे ७६ वर्षे आहे. त्याने केलेल्या अर्जावर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता.

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर
Arun Gawli News: चुकीला माफी नाहीचं! डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका; मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयाला स्थगिती

अरुण गवळीने जन्मठेप प्रकरणी १७ वर्षे कारागृहात शिक्षा भोगली. त्याचे वय ७६ वर्षे झाले. वयाचा विचार करून कोर्टाने त्याला जामीन दिला. सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर आज त्याची तुरूंगामधून सुटका झाली. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर अरुण गवळीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. पांढरा शर्ट, पांढरी पँट, पांढरी टोपी आणि पांढऱ्या रंगाची चप्पल अशा लूकमध्ये अरुण गवळी दिसला.

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर
Arun Gawli News: 'डॅडी'च्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ! डॉन अरुण गवळीवरील मोक्का कारवाईची फाईल सापडेना; गुन्हे शाखेची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com