Tiger: उमरेड करांडला अभयारण्यात एकाच वेळी 7 वाघांचे दर्शन, पहा व्हिडीओ

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील उमरेड करांडला अभयारण्यात पर्यटकांना एकाच वेळी 7 वाघाचे दर्शन झाले आहे.
Tiger
Tiger Saam Tv
Published On

भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील उमरेड करांडला अभयारण्यात पर्यटकांना एकाच वेळी 7 वाघाचे दर्शन झाले आहे. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या दृष्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे (Umred Karhandla Wildlife Sanctuary 7 Tigers Seen).

Tiger
Video : जीव गेला तरी बेहत्तर बिबट सफारी पार्क शिवनेरी पायथ्यालाच उभारेन !:सोनवणे

तुमसर येथील महेश गायधने हे आपल्या मित्रांसोबत उमरेड करांडला अभयारण्यात काल सकाळी जंगल सफारीला (Jungle Safari) गेले होते. तिथे त्यांना सूर्य वाघ, फेरी वाघीण आणि त्यांचे 5 शावक पाहायला मिळाले. हे सर्व त्या परिसरात भटकंती करताना दिसून आले. तर वाघाचे शावक हे एकमेकांसोबत खेळताची दृष्येही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

पाहा व्हिडीओ

उमरेड करांडला अभयारण्यात वाघ (Tiger) सहजासहजी दिसत नाहीत. मात्र, एकाच वेळी वाघाचा संपूर्ण परिवार दिसल्याने पर्यटकांची पावले पुन्हा उमरेड करांडला अभयारण्याकडे वळू लागली आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com