उठ सूट PHD करणाऱ्यांना चाप UGC कडून नवीन नियम

नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी आणि आराखडा मंजूर करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसीने एक बैठक आयोजित केली होती.
New Education Policy
New Education PolicySaam TV
Published On

औरंगाबाद: उठ सूट पीएचडी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी यूजीसीकडून नवीन नियम केले जात आहेत. युजीसीच्या (UCG) बैठकीत पीएचडी (PHD) प्रवेशासाठी करण्यात आलेल्या सुधारणांच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे. त्यात पीएचडीसाठी प्रवेश घेण्यासाठी नेट आणि जीआरएफ असलेल्या पात्रताधारकांसाठी ६० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित जागांवर पेट किंवा इतर परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे गुणवत्ता नसतानाही पीएचडी करणाऱ्याची संख्या कमी होणार आहे. यूजीसीच्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढच्या टप्प्यात याबाबत अधिकृतपणे निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी आणि आराखडा मंजूर करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसीने एक बैठक आयोजित केली होती. देशात अनेक विद्यापीठांमध्ये मार्गदर्शक नसल्याचे कारण सांगून नेट-सेट, जीआरएफ असणाऱ्या उमेदवारांना पीएचडीसाठी प्रवेश मिळत नसल्याचं आढळून आले. त्याशिवाय विद्यापीठाच्या माध्यमातून पेट परीक्षेत विद्यार्थीच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने त्याच प्रवेश प्रक्रियेला अधिक प्राधान्य दिले जाते, त्यामुळे गुणवत्ता असूनही नेट-सेट, जीआरएफच्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अडचणी येत असतात. आता त्या अडचणी दूर करण्यासाठी यूजीसीनेच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उठ सूट आणि गुणवत्ता नसतानाही केवळ मिरवण्यासाठी पीएचडी करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com