Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात अचानक बदल; कसं असणार नवीन शेड्युल

Ram Mandir: नाशिकला पोहचल्यानंतर ओझर विमानतळावरून थेट भगुरला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावून सावरकरांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे संध्याकाळी श्री काळाराम मंदिरात काळारामाची आरती घेणार आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray saam tv
Published On

Uddhav Thackeray:

अयोध्येत आज श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या आजच्या दौऱ्यात काही बदल झालेत. ते बदल नेमके काय आहेत याबाबत जाणून घेऊ.

Uddhav Thackeray
Nashik च्या काळाराम मंदिरात 22 जानेवारीला Uddhav Thackeray करणार महाआरती!

उद्धव ठाकरे १२.३० वाजता नाशिकला पोहचणार आहेत. नाशिकला पोहचल्यानंतर ओझर विमानतळावरून थेट भगुरला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावून सावरकरांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे संध्याकाळी श्री काळाराम मंदिरात काळारामाची आरती घेणार आहेत. नंतर गोदा तीरावर गोदावरीची आरती करणार आहेत.

अयोध्येतील राम मंदिरावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. उद्धव ठाकरेंना देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र त्यांनी अयोध्येतील रामाचे दर्शन नंतर घेण्याची इच्छा व्यक्त केलीय. तसेच आज उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणारेत.

आजच्या अयोध्येतील सोहळ्यावरून खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपला टोला लगावला आहे. राम सर्वांचे आहेत, ते जेवढे अयोध्येत आहेत. तेवढेच पंचवटीत सुद्धा आहेत. म्हणूनच आम्ही आज दर्शनासाठी पंचवटीला जातोय. लवकरच आम्ही अयोध्येत देखील जाऊ, एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा त्यांना आम्हीच अयोध्येत घेऊन गेलो होतो. ते आता भाजपात आहेत, त्यांना भाजपचे आदेश पाळावे लागतील, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray
Atal Setu Accident Video: अटल सेतूवर पहिला भीषण अपघात; दुभाजकाला धडक देऊन कार उलटली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com