
MNS-Shiv Sena Alliance : महापालिका निवडणुकीपूर्वी हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र रणशिंग फुंकलंय. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलाय. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
मुंबई महापालिकेत मराठी मतांचं विभाजन टळेल
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद
शहरी भागांमधील ठाकरे गट आणि मनसेच्या ताकदीचा एकत्रित फायदा
मनसे स्वतंत्र लढल्यास महायुतीला फायदा होण्याची शक्यता जास्त
उद्धव ठाकरेंचं संघटन आणि राज ठाकरेंच्या भाषणशैलीचा फायदा होण्याची शक्यत
विधानसभेत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंपासून दबदबा असलेला ठाकरे ब्रँडच अडचणीत सापडलाय. त्यापार्श्वभुमीवर दोन्ही भावांनी एकमेकांना साद घातली. तर कार्यकर्त्यांचंही मनोमिलन झालंय. त्यापार्श्वभुमीवर आता मोर्चासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याने ही युतीची पायाभरणी असल्याची चर्चाय. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणं एवढं काही सोपं नाही.
दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत महाविकास आघाडीनेही सकारात्मक संकेत दिलेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे नारा दिला होता. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय घेतलाय. त्याविरोधात ठाकरेंनी बिगूल वाजवला असला तरी जागा वाटपासह युतीच्या चर्चांमध्ये एकमेकांचे प्रस्ताव मान्य होणार की युतीची चर्चा पुन्हा बारगळणार? याचीच चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.