सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोक्क्यातील एक आरोपी असलेल्या नगरसेवकाच्या त्याच गुन्ह्यातील साथीदारांना जामीन मिळाल्यानंतर साताऱ्यात एका पत्रकार परिषदेत साताऱ्यातील पोलिस प्रशासन आणि सरकारी वकील यांचा समचार घेत लोकप्रतिनिधीचा पोलिस आणि प्रशासनावर दबाव वाढतोय असा आरोप केला आहे. udayanraje-bhosale-addressed-media-on-crime-satara-trending-news-sml80
यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि हे लोकशाहीला मारक असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. ते म्हणाले काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात. त्यांना निवडून आणतात. त्यांच्या मार्फत दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न होतो.
हे असेच चालू राहिले तर जंगलराज येईल अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली. ते म्हणाले पाेलिस प्रशासनाने त्यांचे काम चाेख बजावले पाहिजे. आज एकावर हल्ला झाला उद्या दुस-यावर हाेईल, परवा तुमच्यावरही हल्ला होऊ शकतो. मग त्या वेळी तुम्ही कोठे जाणार असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.