Satara Politics: तुम्ही पुन्हा नकाे हे सातारकरांनी त्या वेळीसच ठरवलं : उदयनराजे

गेल्या पाच वर्षात सातारा विकास आघाडीने लोकहिताची कामे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून केली आहेत.
udayanraje bhosale & shivendraraje bhosale
udayanraje bhosale & shivendraraje bhosalesaam tv
Published On

सातारा : प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन कसे केले, वर्क ऑर्डर आहे का, असले नकारात्मक प्रश्न ज्यांनी उभे केले, तेच आज प्रशासकीय इमारतीसाठी रुपये १० कोटी मिळाल्याबद्दल अभिनंदन करीत आहेत. ते दुतोंडी असल्यानेच त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे अशी टीका खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांच्यावर केली आहे. (udayanraje bhosale latest marathi news)

सातारा (satara) पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दाेन्ही राजेंत सध्या एकमेकांवर टीकासत्र सुरु आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पालिकेतील भ्रष्ट घाण फेकून द्यावी असे आवाहन सातारकरांना करीत खासदार भाेसले यांच्या सातारा विकास आघाडीचा नुकताच समाचार घेतला हाेता. त्या टीकेस खासदार भाेसले यांनी उत्तर दिलं आहे.

udayanraje bhosale & shivendraraje bhosale
Dombivali: भावविवश झालेला अजिंक्य रहाणे म्हणाला आजही माझ्या हृदयात...

खासदार भाेसले म्हणाले गेल्या पाच वर्षात एक तरी मोठे काम दाखवा असे काल पर्यंत केकाटणारे आज ग्रेड सेपरेटर आम्ही केला, प्रशासकीय इमारत चांगली होईल असे बाेलू लागले आहे. गेल्या पाच वर्षात सातारा विकास आघाडीने लोकहिताची कामे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून केली आहेत. प्रत्येक ठिकाणी व स्तरावर विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यांच्याकडे ४० वर्षे सत्ता असताना जे काही व्हायला पाहिजे होते ते कधीच झाले नाही. त्यामुळे साविआने केलेल्या कामांचा धसका घेवून दुतोंडी भुमिका यांना घ्यावी लागत आहे. दुतोंडी आणि स्वार्थी असणाऱ्या बाजारबुणग्यांची कुजकट दुर्घंधी युक्त घाण यापूर्वीच सातारकरांनी पालिकेतुन बाहेर काढून दूर फेकून दिली आहे. त्यावेळी नाक देखील कापले गेले तरी सुध्दा भोके आहेत असे म्हणत वर तोंड करुन ते फिरत आहेत अशी टीका उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर केली.

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale & shivendraraje bhosale
Satara: पाेलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातली Car; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

हे दुटप्पी राजकारणी साविआच्या कामाचे अभिनंदन करुन आपणच निधी आणला अशा दुटप्पी अविर्भावात आहेत. त्यामुळे आयत्या रेघोटा मारणा-या बाजीरावांना सातारा पालिकेच्या पाय-या सुध्दा दिसू नयेत अशी भुमिका समस्त सातारकरांनी घेतली आहे. उपसुन, फेकून दिलेली घाण पुन्हा कधीच नको असेच सातारकर आता म्हणत आहेत असेही उदयनराजेंनी नमूद केले.

udayanraje bhosale & shivendraraje bhosale
Satara: सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी मुलींसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र; २४ कोटींची मान्यता
udayanraje bhosale & shivendraraje bhosale
Satara Politics: त्यांना हद्दपार करण्याची हीच ती वेळ : शिवेंद्रसिंहराजे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com