धक्कादायक! महिलेसह दोन चिमुकल्यांचा विहिरीत पडून मृत्यू; आत्महत्येची शक्यता

महिलेने मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Solapur Latest Marathi News, Solapur Crime News in Marathi
Solapur Latest Marathi News, Solapur Crime News in MarathiSaam Tv

सोलापूर: दक्षिण सोलापूर (Solapur) तालुक्यातील आलेगाव शिवारातील एका विहिरीत विवाहित महिलेचा दोन लहान मुलांसह मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वळसंग पोलीस (Police) ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. (Solapur Latest Marathi News)

या महिलेने मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आत्महत्या केलेली महिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्हेहाळ गावची रहिवासी आहे. महिलेचे नाव सोनाली चोपडे, मोठा मुलगा संतोष चोपडे आणि लहान मुलगा संदीप चोपडे अशी मृतांची नावे आहेत.

Solapur Latest Marathi News, Solapur Crime News in Marathi
शिवसेनेला धक्का; आमदार रमेश लटकेंचं दुबईत निधन

या प्रकरणाची माहिती सुरेश चोरमले याने वळसंग पोलीस ठाण्यात दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव येथे दयानंद शिंदे यांची शेती आहे. या शेतात तिल्हेहाळ येथील विवाहित महिला सोनाली चोपडे हिने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com