तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

'आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने तुळजाभवानी मंदिर दुमदुमले.
tuljabhavani
tuljabhavani

- कैलास चाैधरी

तुळजापूर : तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्रापूर्वीच्या तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस सोमवारी रात्री पासून प्रारंभ झाला. रात्री अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. tuljapur tuljabhavani mandir latest marathi news

सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेसाठी मातेचा पलंग स्वच्छ धुवून घेतला होता. तसेच आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजून काढला. तुळजाभवानी मातेची आठ दिवसांची मंचकी निद्रा संपवून दहा जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल. अभिषेक पुजेनंतर खंडोबाचे (khandoba) पुजारी वाघे यांनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावण्यात आला.

tuljabhavani
महाबळेश्वरच्या बाजारपेठेत गव्याचा तासभर फेरफटका; जंगलात रवाना

तुळजापूरात (tuljapur) 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात देवीची मूर्ती सिहांसनावरून हलवून पलंगावर ठेवण्यात आली. तत्पूर्वी गाभाऱ्यात दोन धार्मिक विधी उरकण्यात आले. त्यानंतर पलंगावरच प्रक्षाळ पूजा करण्यात आली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com