Reservation Row: बंजारा,धनगरां विरोधात आदिवासी आक्रमक,आदिवासींची थेट मुंबईत धडक

Tribal Uprising in Mumbai: बंजारा आणि धनगर समाजाविरोधात थेट उलगुलानचा नारा देत आदिवासी मुंबईत धडकलेत.. मात्र धनगर आणि बंजारा समाजाविरोधात आदिवासी आक्रमक का झालेत? त्यांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत?
Tribal protestors in Mumbai raise slogans against Banjara and Dhangar communities, warning the Maharashtra government over reservation intrusion.
Tribal protestors in Mumbai raise slogans against Banjara and Dhangar communities, warning the Maharashtra government over reservation intrusion.Saam Tv
Published On

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलेला असतानाच आता धनगरांनंतर आता बंजारांविरोधात आदिवासी समाज थेट मुंबईत धडकलाय...या मोर्चाला कारण ठरलंय मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार मिळणारे कुणबी दाखले...आता याच गॅझेटियरमधील नोंदीनुसार बंजारा समाजानेही आदिवासी आरक्षणाची मागणी करत हजारोंच्या संख्येनं राज्यात वातावरण तापवायला सुरुवात केलीय.. त्यामुळे आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी थेट मुंबईत धडकले. मात्र प्रशासनाने हा मोर्चा मुलूंड चेकनाक्यावरच अडवला... यावेळी आक्रमक झालेल्या आदिवासींनी आरक्षणात घुसखोरी झाल्यास धरणं फोडून मुंबईचं पाणी तोडण्याचा इशारा दिलाय..

एवढंच नाही तर सत्ताधारी राष्ट्रवादीचे आदिवासी आमदार किरण लहामटेंनीही चक्काजाम करण्याचा इशारा दिलाय...दुसरीकडे मोर्चा थांबवण्यात आल्यानंतर आदिवासींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नेण्यात आलं.. यावेळी आदिवासींनी नेमक्या काय मागण्या केल्या?

आदिवासींच्या मागण्या काय?

बंजारा आणि धनगर समाजामुळे आदिवासींच्या हक्कांवर गदा येणार आहे, त्यामुळे आरक्षणात घुसखोरी नको

अनुसूचित जमातीच्या कोट्यातील हजारो रिक्त पदं तात्काळ भरा

पेसा कायद्याची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करा

आदिवासींच्या ताब्यातील वनजमिनी नावावर करा

जात पडताळणी कायद्यात सुधारणा करुन बोगस प्रमाणपत्रं रद्द करा

राज्यात 9 टक्के आदिवासींच्या 47 जमाती आहेत. त्यांना 7 टक्के आरक्षण देण्यात आलंय.. त्यातच आदिवासींना विधानसभेच्या 25 जागा राखीव आहेत.. तर तब्बल 38 मतदारसंघावर आदिवासींचं वर्चस्व आहे... दुसरीकडे 13 टक्के धनगर आणि 8 टक्के बंजारा समाजाची लोकसंख्या आहे.. त्यामुळे सरकार बहुसंख्याकवादापुढे झुकून निर्णय घेणार की आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...मात्र आरक्षणाच्या वादामुळे राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण होतेय, हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com