Tribal Reservation : आदिवासींना नोकरीत वाढीव आरक्षण मिळणार? राज्यातील ८ जिल्ह्यांतील बांधवांना होणार फायदा

Tribal Reservation Jobs महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत अधिक लोकसंख्या असलेल्या आदिवासी भागातील तरुणांना नोकरीमध्ये आरक्षण वाढवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
Tribal Job 
Chandrashekhar Bawankule
Tribal Job Chandrashekhar Bawankule Saam Tv
Published On

मुंबई : महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिपत्याखाली आज (दि २५) मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर तोडगे काढण्यात आले. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावेंची उपस्थिती होती.

महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालय येथे बैठक घेतली. समितीची ही दुसरी बैठक असून या बैठकीत राज्यातील पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांत आदिवासींची संख्या अधिक असल्याने याठिकाणी नोकरीमध्ये आरक्षण वाढवून देण्याची आवश्यकता असून, यासाठी इतर मागासवर्ग, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस या वर्गातील आरक्षण काही प्रमाणात कमी करुन ते आदिवासी समाजास देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत शिक्षणमंत्री दादा भूसे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली बाजू मांडत आदिवासी समाजास अतिरिक्त आरक्षण देताना एसईबीसी आणि ईडब्लूएस तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करु नये अशा सूचना केल्या.

तर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके आणि इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनीही बैठकीत आपले मत व्यक्त केले. सर्व सदस्यांच्या मतांचा विचार करुन याबाबतचा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com