Yavatmal: आर्णी महावितरण कडून थ्री कटिंगच्या नावावर वृक्षाची कत्तल

महावितरण ने परवानगी घेतली नसल्याचे वनविभागाने केले स्पष्ट
Yavtamal News
Yavtamal NewsSaam Tv
Published On

संजय राठोड

यवतमाळ - काल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शासना कडून मोठा गाजावाजा करून पर्यावरणाच्या संरक्षणासठी आणि संवर्धनासाठी जनजागृती केली. मात्र आर्णी ते दिग्रस रोड वर महावितरणच्या कर्मचार्‍यांनी भर दुपारी कडूनिंबाच्या झाडाची कत्तल केली. त्यामुळे शासनाने महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरण बाबत जनजागृती केली नाही का असा सवाल पर्यावरण प्रेमींकडून उपस्थितीत केल्या जात आहे.

हे देखील पाहा -

सध्या पावसाळ्याच्या तोंडावर थ्री कटिंगचे काम महावितरण कडून केल्या जात आहे.अशात कोणतीही परवानगी न घेता थेट झाडाची कत्तल करणे कितपत योग्य आहे? विघुत पुरवठा करणाऱ्या खांबाला झाडाची फांदी लागत होती तर महावितरण ला झाड न कापता ती फांदी तोडता आली असती. मात्र कायमाची खटखट नकोय म्हणुन थेट झाडाची कत्तल करणे हे कोणत्या नियमात बसते असा संतप्त सवाल या निमित्याने उपस्थित केला जात आहे.

Yavtamal News
बॅक ऑफ महाराष्ट्रात अपहार; बॅंक मॅनेजरसह २५ कर्जदारांवर गुन्हा दाखल

पर्यावरण प्रेमींनी झाडाची कत्तल करण्याबाबत वनविभागाकडून परवानगी घेतली का असा सवाल केल्या नंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आमच्या कडे परवानगी असल्याचा दावा केला. परवानगी दाखविण्याची विनंती महावितरणला केल्या नंतर परवानगी उद्या ऑफीस मध्ये दाखविल्या जाईल असे सांगून हात वर केले. मात्र या गंभीर प्रकरणावर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ॠदेश रोडगे यांनी महावितरणला वनविभागाकडून कोणतीही परवानगी दिलेली नाही असे म्हटले आहे.त्यामुळे आता महावितरणच्या अधिकाऱ्यांवर अवैध झाडाची कत्तल केल्या प्रकरणी वनविभागाकडून कोणती कारवाई केल्या जाते याकडे पर्यावरण प्रेमीचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com