Today's Marathi Batmya Live: अकोल्यात ४ तोतया पोलिसांना अटक; पोलीस असल्याचं भासवून करायचे मोटर सायकल चोरी

Maharashtra Latest Breaking News and Update in Marathi (22 February 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांना संक्षिप्त आढावा.
Today's Maharashtra Marathi News Live 22 February 2024 | Latest Update on Maratha Reservation Manoj Jarange Patil, Wadhwan Port, Uddhav Thackeray Maratha Reservation and on Overall Maharashtra News
Today's Maharashtra Marathi News Live 22 February 2024 | Latest Update on Maratha Reservation Manoj Jarange Patil, Wadhwan Port, Uddhav Thackeray Maratha Reservation and on Overall Maharashtra News Saam TV
Published On

अकोल्यात ४ तोतया पोलिसांना अटक; पोलीस असल्याचं भासवून करायचे मोटर सायकल चोरी

अकोल्यात तोतया पोलिसांच्या टोळीनं चांगलाच धुमाकूळ घातलाय. पोलीस असल्याचं सांगत दुचाकी चोरी करत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले. अखेर त्याचा घडा भरला अन् टोळीतील चौघे जण पोलिसांच्या हाती लागले. दरम्यान पोलिसांचा पेहराव करून फिरणाऱ्या 4 तोतया पोलिसांना गजाआड करण्यात पातुर पोलिसांना यश आलंय.

उल्हासनगरमध्ये तरुणाचा आंघोळी करताना शॉक लागून मृत्यू

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील राधेश्याम नगर येथे एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या तरुणाचं नाव सुजल गाडपेकर असे असून तो अठरा वर्षाचा होता, दुपारी साडे तीन च्या सुमारास सुजल घराबाहेर असलेल्या एका जागेवर आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा शॉक लागून तो जखमी झाला ,त्याला लागलीच मध्यवर्ती रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, या घटनेला एमएसईबी जबाबदार असल्याचा आरोप मृत सुजल चे नातेवाईक करीत आहेत, या घटनेने राधेश्याम नगर परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ठाण्यातील वादग्रस्त खाजगी शाळेतील विनयभंग प्रकरणी संपूर्ण व्यवस्थापनचीच बदली होणार? समिती घेणार निर्णय

ठाण्यातील वादग्रस्त खाजगी शाळेतील विनयभंग प्रकरणी शाळा प्रशासनाने तीन शिक्षकांना निलंबित केल आहे . सदरचा प्रकरणातील सर्वच शिक्षकांना निलंबित करण्यात यावं तसंच पूर्ण व्यवस्थापन बदली करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली होती. आता एक समिती गठीत करण्यात आली आहे या पुढे समिती निर्णय घेणार आहे. आज देखील पालकांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केल होत

ण्यात पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी वाया, शिवनेरी रस्त्याला आले नदीचं स्वरूप

- पुणे बाजार समितीच्या पाण्याच्या टाकीतून पिण्याचे पाणी वाया

- कृषी उत्पन्न बाजार समिती पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व खराब झाल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले.

- टाकीत पाणी जास्त असल्याने पाण्याचा प्रेशर जास्त होता. तब्बल दोन ते अडीच तास पाणी वाहत होते. यामुळे मार्केट यार्ड येथील शिवनेरी रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.

- आज दुपारी १२ च्या सुमारास अचानक टाकीचा व्हॉल्व मधून प्रचंड पाण्याची गळती सुरू झाली. टाकीत असलेले हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले

- यामुळे बाजार घटकांच्या पाणी पुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला. त्यांनतर संध्याकाळपर्यंत व्हॉल्वची दुरुस्ती करत तळभागातील टाकीतील पाणी वरच्या टाकीत चढवून पाणीपुरवठा करण्यासाठी सुरुवात केली.

कांद्यावरील निर्यात बंदी अखेर अंशतः उठली, निवडक देशांसाठी कांदा निर्यात खुली

भारतातून ५५ हजार टन कांदा परदेशात जाणार

बांगलादेश, बहारीन, मॉरिशस, भूटान या देशांमध्ये होणार ५५ हजार टन कांद्याची निर्यात

ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांची माहिती

कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी ३ महिन्यांपूर्वी केंद्रानं कांद्यावर लादली होती निर्यातबंदी

सध्या ३१ मार्चपर्यंत निर्यातबंदी लागू असली, तरी ४ मित्र देशांसाठी कांदा निर्यातीला सूट

अजित पवार यांना ज्या आमदारांनी साथ दिली ते सगळे निवडून येतील; सुनील तटकरे

राज्यात आता अजितपर्व आहे, आणि इतिहास बदलणारा नेत्या म्हणून आम्ही अजित पवार यांच्याकडे पाहतोय ., त्यामुळं अजित पवार यांना ज्या आमदारांनी साथ दिली ते सगळे आमदार निवडून येतील., मात्र आता जितक्या जागा लढू त्या जागा देखील मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेत बोलून दाखवलाय

अजित पवार यांच्या आवाहनानंतरही निवासी डॉक्टर संपावर ठाम

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल दुपारी मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाकडून माहिती

काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं

पुन्हा प्रकृती बिघडल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल केले

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवरून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दरीत पडून मृत्यू

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवरून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दरीत पडून मृत्यू

साक्षी रमेश होरे असं 21 वर्षीय मुलीचं नाव

साक्षी डीवाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती

मात्र तिने आत्महत्या केली की पाय घसरून दरील पडली हे नेमकं कारण समजू शकलेले नाही

मनोज जरांगे पाटलांनी आता आंदोलन मागं घ्यावं,  दादा भुसे यांचे आवाहन

मनोज जरांगे पाटलांनी आता आंदोलन मागं घ्यावं,  दादा भुसे यांचे आवाहन

त्यांनी जे आंदोलन उभे केले त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि 10 टक्के आरक्षण दिलं

शरद पवार आणि जयंत पाटील यांची सिल्वर ओकवर तब्बल 4 तास बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सिल्वर ओक निवासस्थानी तब्बल 4 तास मॅरेथॉन बैठक

बैठकीमध्ये पक्षाचे चिन्ह पक्षाचे नाव काय असावं याबाबत चर्चा

शरद पवार यांनी पक्ष लढवत असलेल्या लोकसभेच्या जागांबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून माहिती घेतली

सध्या पक्ष लढवण्याची शक्यता असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवाराकडून जोरदार कार्यक्रम घेतले जात आहेत. या उमेदवारांच्या निवडून येण्याच्या शक्यतेबाबत देखील शरद पवारांनी माहिती घेतली

आता लवकरच जयंत पाटील यांच्याकडून पक्ष लढवत असलेल्या लोकसभा मतदारसंघाचा पहिला दौरा पार पडल्यानंतर दुसरा दौरा पार पडणार

महाविकास आघाडीच्या 27 तारखेच्या बैठकीमध्ये जागांबाबत शिक्कामोर्तब होणार

Wadhwan Port Palghar: पालघर वाढवण बंदर संघर्ष समितीकडून रास्तारोको मागे

पालघर : तब्बल अडीच तासानंतर वाढवण बंदर संघर्ष समितीकडून सुरू करण्यात आलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे. पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे.

Nadurbar News: नंदुरबारमधील करण चौफुली परिसरात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी केल लंपास

नंदुरबारमधील करण चौफुली परिसरात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी केल लंपास

एटीएममध्ये २६ लाख रुपयांची रोकड असल्याची बँक अधिकाऱ्यांची माहिती

१० किलोमीटर अंतरावर एटीएममधून पैसे काढत खाली एटीएम मशीन कोळडे गावाजवळ शेतात फेकलेले आळून आले

पोलिसांकडून आरोपींच्या शोधात पथके रवाना

Today's Maharashtra Marathi News Live 22 February 2024 | Latest Update on Maratha Reservation Manoj Jarange Patil, Wadhwan Port, Uddhav Thackeray Maratha Reservation and on Overall Maharashtra News
Nagar : काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांनी आम्हांला पक्षनिष्ठा शिकवू नये : विखे-पाटलांचा थाेरातांना टाेला

Mumbai- Ahmedabad Highway: पालघर-वाढवण बंदराचा संघर्ष तीव्र, आंदोलकांनी मुंबई अहमदाबाद महामार्ग अडवला

पालघर _वाढवण बंदराचा संघर्ष हा तीव्र झालेला पाहायला मिळतोय मागील दोन तासा पासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चारोटी येथे आंदोलकांकडून अडवला गेला असून संपूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये बंदर होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

Today's Maharashtra Marathi News Live 22 February 2024 | Latest Update on Maratha Reservation Manoj Jarange Patil, Wadhwan Port, Uddhav Thackeray Maratha Reservation and on Overall Maharashtra News
X Accounts Suspended : 'सरकारचा आदेश मान्य पण सहमत नाही', शेतकरी आंदोलनासंबंधित अनेक X अकाऊंट्स बॅन

Latur Update: लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील खासदार सुनील तटकरे, मंत्री संजय बनसोडे, रूपाली चाकणकर यांना लातूरमध्ये मराठा समाजातील आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी

काळे झेंडे दाखवणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे..

Ratnagiri News: रत्नागिरी- आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन मंजूर

रत्नागिरी- आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांना न्यायालयाचा दिलासा

ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांच्या पीएवर ईडीकडून गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांच्या पीएवर ईडीकडून गुन्हा दाखल

दिनेश बोभाटे यांच्यावर ईडीने दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा

दिनेश बोभाटे यांच्यावर काही दिवसापूर्वीच सीबीआयने केला होता भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

कोविड काळातील कथित शव पिशवी घोटाळा प्रकरण

कोविड काळातील कथित शव पिशवी घोटाळा प्रकरण

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना 21 मार्चपर्यंत दिलासा कायम

याप्रकरणात अंतरिम दिलासा मिळावा यासाठी पेडणेकर यांनी केली आहे, उच्च न्यायालयात याचिका

मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला दणका, 'द इंद्राणी मुखर्जीया स्टोरी: बरीड ट्रूथ'चं डॉक्युमेंट्री रिलीज थांबवलं

मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला दणका

उद्या प्रदर्शित होणाऱ्या ' "द इंद्राणी मुखर्जीया स्टोरी: बरीड ट्रूथ," डॉक्युमेंट्री रिलीज थांबवलं

हायकोर्ट, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग करण्याचे नेटफ्लिक्सला निर्देश

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्यापुढे झाली सुनावणी

29 फेब्रुवारीला हायकोर्टात पुन्हा सुनावणी

वेब सीरीजमुळे खटल्यावर परिणाम होईल, सीबीआयचा आक्षेप

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांचा रास्तारोको आंदोलन

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांचा रास्तारोको आंदोलन

हिवरा ते ईजनी या रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको

दीड तासापासून रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग, घटनास्थळी महागांव पोलीस दाखल

दोन कोटी रुपयांचा कामासाठी निधी मंजूर, मात्र काम सुरू न केल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्ग संतप्त

दोन्ही बाजूची वाहतुक सेवा कोलमडली

लेखी दिल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हटणार नसल्याचा विद्यार्थ्यांसह पालकांचा पवित्रा

महागांव पोलीस घटनास्थळी, समजून काढण्याचा प्रयत्न

स्थनिक स्वराज्य संस्था आणि OBC प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

स्थनिक स्वराज्य संस्था आणि OBC प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

४ मार्च ला होणारी सुनावणी आता पुढे ढकलली

आता सुनावणी १६ एप्रिल ला होण्याची शक्यता

मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी झाली नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अंधारात

मनमाड शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत शहरातील मुख्य बाजार पेठेतील 4 मोठी दुकाने फोडली

मनमाड शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत शहरातील मुख्य बाजार पेठेतील 4 मोठी दुकाने फोडली

रोख रकमेसह इतर वस्तू चोरून पसार

वर्दळ असलेल्या बाजार पेठेत चोरीची घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

एनएचआय आणि काँक्रिटीकरण करणाऱ्या कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा वाहन चालकांना फटका

गुजरात वाहिनीवर टोल नाका ते वसई फाट्यापर्यंत पहाटेपासून वाहतूक ठप्प.

महामार्ग पोलीस फक्त वसुलीसाठीच आहेत का ? संतप्त वाहन चालकांचा सवाल..

वनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये वनरक्षक विभागाचा सावळा गोंधळ

वनरक्षक भरतीच्या फिजिकल टेस्टमध्ये वनरक्षक विभागाचा सावळा गोंधळ

काल झालेल्या 4 आणि 5 वाजताचच्या बॅचला सायंकाळपर्यंत बसवून ठेवत चाचणी न घेता माघारी पाठवले

उमेदवार आज चाचणीसाठी आले असता त्यांना चाचणीचर मार्क दिले जात नसल्याचं परीक्षार्थींना आरोप

भरतीमध्ये घोटाळा होत असल्याचा संशय केला उमेदवारानी व्यक्त

आज सकाळी पार पडली चाचणी

नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट, गंगापूर धरणात ६१.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक

नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट

फेब्रुवारीतचं पाणीटंचाईची दाहकता वाढली

गंगापूर धरणात ६१.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक

मागील वर्षाच्या तुलनेत १३ टक्के कमी पाणीसाठा

तर गंगापूर धरण समूहात देखील मागील वर्षाच्या तुलनेत ६ टक्के कमी म्हणजेच ६५ टक्के पाणी

३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी २० टक्के पाणी कपातीचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

महापालिका पाणी पुरवठा विभाग आणि जलसंपदा विभागाच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पैठण शहरातल्या लक्ष्मीनगर येथे एका 32 वर्षीय तरूणाची हत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पैठण शहरातल्या लक्ष्मीनगर येथे एका 32 वर्षीय तरूणाची हत्या

तोंडावर आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून

कृष्णा एकनाथ डोळस असे मृत तरूणाचे नाव

पैठण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

पुणेकराना मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यास टाटाची तत्वतः मंजुरी

पुणेकराना मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यास टाटाची तत्वतः मंजुरी

मुळशी धरणाची उंची वाढवून जो पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होईल त्यातून शहराला पाणी देता येईल

काल अजित पवारांनी जलसंपदा विभागाची घेतली ऑनलाइन बैठक

बैठकीत जलसंपदा विभाग आधी टाटाला उंची वाढवण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करणार

मग राज्य सरकारला प्रस्ताव सदर केला जाणार आहे

धरणाची १ मीटरने उंची वाढवल्यानंतर मिळणार पाणी

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई'चे उद्घाटन होणार

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई'चे उद्घाटन होणार

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १७ थोर व्यक्तींचे पुतळे एकाच उद्यानात बसवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचा समावेश

मुंबईसह राज्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासात योगदान दिलेल्या थोर व्यक्तींचे अर्धा कृती पुतळे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री मंगल प्रभाग लोढा राहणार उपस्थित

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे एका माजी नगरसेवकावर अज्ञात आरोपीने केला हल्ला

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे एका माजी नगरसेवकावर अज्ञात आरोपीने केला हल्ला

हल्ल्यात माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे जखमी

कामठीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू

अज्ञात आरोपीने हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला करून पळ काढला

पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला

दिलीप बांडेबूचे रात्री घरी जात असताना घडली घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com