Today's Marathi News Live: पोहोयला गेलेल्या चार मुली बुडाल्या, महाबळेश्वरमधील घटना

Maharashtra Latest News and Update in Marathi (31 March 2024) : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Maharashtra chya Tajya Marathi Batmya Live 31 march 2024
Maharashtra chya Tajya Marathi Batmya Live 31 march 2024Saam Tv

पोहोयला गेलेल्या चार मुली बुडाल्या, महाबळेश्वरमधील घटना

महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील कोयना जलाशयात वाळणे गावात दुर्दैवी घटना...

12 ते 13वया गटातील चार मुली पोहायला गेल्या असताना बुडाल्या...

घटनास्थळावर आरडाओरडा झाल्यानंतर गावकऱ्यांनी पोहताना बुडालेल्या चारही मुलींना बाहेर काढले. यामध्ये दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालाय दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.एक जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्याच्या वाघोलीत केसनंद रोडवरील देशी दारूच्या दुकानांमध्ये राडा

वाघोली पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर हा घटना घडली घटना. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून यातील एक पीएमपीएल चा कर्मचारी आहे. कोणत्या कारणावरून हा राडा झाला याचे कारण मात्र कळू शकले नाही. मात्र या माराहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेन चौकात दारूची दुकान असल्याने महिलांना याचा खुप त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे लोणीकंद पोलीसांनी कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

महायुतीच्या प्रचारासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात योगी आदित्यनाथ येणार बुलढाण्यात

खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खामगाव येथे प्रचार सभा होणार आहे. या प्रचार सभेचं नियोजन आतापासून शिंदे गटाचे खा.प्रतापराव जाधव यांच्याकडून सुरू झाल्याची माहिती आहे.

हेमंत पाटलांच्या उमेदवारीला माहूर गडाच्या महंतांचं चॅलेंज

हिंगोली लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भाजप व शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून राजकीय युद्ध सुरू आहे. भाजपच्या तीन आमदारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर भाजप निवडणूक लढवण्यास तयार आहे. हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करा अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर माहूर गडाचे महंत योगी शाम भारती यांनी देखील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना देण्यात आला होता दिलासा

त्या विरोधात अंजली दमानिया यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होती

दमानिया यांच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

दिलीप माने यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; नाना पटोले यांनी केलं स्वागत

दिलीप माने यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सोलापुरातून प्रणिती शिंदे उभ्या आहेत त्यांना मोठ्या फरकाने जिंकून आणू ,असा विश्वास माने यांनी पक्ष प्रवेशावेळी व्यक्त केला. नाना पटोले यांनी त्यांचं स्वागत केलं.

बागेश्वरबाबा याला अटक करावं, अन्यथा कार्यक्रमस्थळी कायदा सुव्यवस्था बिघडू शकते : नरेंद्र भोंडेकर

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे धीरेंद्र शास्त्री (बागेश्वरबाबा) यांचं सत्संग सुरू असून बागेश्वर बाबा यांनी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या बद्दल टीका केली आहे. टीका करतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने आता परमात्मा एक मंडळाचे असंख्य सेवक दुखावले गेले. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेकडो सेवक यांनी रात्री मोहाडी पोलीस स्टेशन गाठत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. बागेश्वरबाबा याला 4 वाजे पर्यंत अटक करावं. अन्यथा कार्यक्रमस्थळी कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.

साताऱ्याच्या जागेवर कोणताच पेच नाही, महायुतीचा उमेदवार लवकरच जाहीर होईल : शंभुराज देसाई

साताऱ्याच्या जागेवर कोणताच पेच नाही, महायुतीचा उमेदवार लवकरच जाहीर होईल : शंभुराज देसाई

साताऱ्यांच्या महायुतीच्या जागावाटपाचा कोणताच पेच नाही

माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली असुन

साताऱ्याच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटेल‌, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलय

स्टंट करणे आणि भरधाव वेगाने बाईक चालवून मुंबई पोलिसांना हुलकावणी देणं पडलं महागात

स्टंट करणे आणि भरधाव वेगाने बाईक चालवून मुंबई पोलिसांना हुलकावणी देणं पडलं महागात

सात बाईक चालकांवर केली मुंबई पोलिसांनी कारवाई

सात बाईक चालकांना अटक करत त्यांच्या बाईक केल्या जप्त

आरोपीने भरधाव वेगाने बाईक चालवत मुंबई पोलिसांना हुलकावणी देत पळतानाचा व्हिडिओ केला होता त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर

समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर मुंबई पोलिसांची कारवाई

बेदरकार पणे बाईक चालवल्या प्रकरणी तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकल्या प्रकरणी केली कारवाई

पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने असं पुन्हा न करण्याचं केलं आवाहन

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित

आमचं नशीब आम्हीच बदलणार, दक्षिण मुंबईत यंदा बदल घडवणारच

आमचं नशीब आम्हीच बदलणार, दक्षिण मुंबईत यंदा बदल घडवणारच

सर्वसामान्य वरळीकर नावाने वरळीत बॅनरबाजी

भाजपने पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचले

वरळीतील बॅनरबाजीने राजकिय वातावरण तापले

वरळीच्या प्रमुख रस्त्यांवर एकूण ३०० ठिकाणी बॅनर

ठाकरेंच्या सेनावर भाजपचा अप्रत्यक्ष निशाणा

खासगी रुग्णालयातील कामगाराला डॉक्टरसह सहा जणांची बेदम मारहाण

लातूरमध्ये एका खाजगी रुग्णालयाच्या लिफ्टचे काम करणाऱ्या कामगाराला रुग्णालयातील डॉक्टरसह इतर सहा जणांनी अपहरण करत बेदम मारहाण केली

लातूर येथील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याने ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

मारहाण केलेले सर्वच आरोपी सध्या फरार, अधिकचा तपास पोलीस करत आहेत

रत्नागिरी - दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला परवापासून होणार सुरुवात

रत्नागिरी - दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला परवापासून होणार सुरुवात

पुण्यातील कंपनीला दिले गेले आहे पाडकामाचे काम

अनधिकृत बांधकाम मी स्वतः तोडतो; मालक सदानंद कदम यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञा पत्राद्वारे दिली आहे माहिती

महागाई, बेरोजगारी, दडपशाही विरोधात माझी लढाई - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

मी इंडिया आघाडीचे आभार मानते, मला पुन्हा एकदा लोकसभेची संधी दिली

बारामती लोकसभा मतदारसंघाचे आभार मानते

माझ्यासाठी वैचारिक लढाई कुठल्या ही व्यक्तीशी नाही

मी वैयक्तिक टीका केलेली नाही

महागाई, बेरोजगारी, दडपशाही विरोधात माझी लढाई असणार आहे.

कोल्हापूर - तिरुपती विमान सेवा आजपासून पुन्हा सुरू

कोल्हापूर - तिरुपती विमान सेवा आजपासून पुन्हा सुरू

कोल्हापूर - तिरुपती विमान सेवा आठवड्यातून 3 दिवस सुरू राहणार

स्टार एअर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली पुन्हा विमानसेवा

रविवार , मंगळवार आणि बुधवारी विमान सेवा सुरू

समृद्धी महामार्गावर तांदळाने भरलेल्या ट्रकला अपघात

समृद्धी महामार्गावर तांदुळाने भरलेल्या ट्रकला अपघात

मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ ट्रकला भीषण अपघात

अपघातात ट्रक चालक व वाहक गंभीर जखमी. दोघांवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

अपघातानंतर जवळच शेतात काम करत असणाऱ्या शेतकऱ्यांनी केली मदत

महामार्गाच साईड रेलिंग तोडून ट्रक उलटला. अपघातानंतर तांदळाचं मोठं नुकसान

शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत वाढ

शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत वाढ

१५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयने पुणे पोलिसांना ३० दिवसांची मुदत वाढ दिली आहे

आरोपपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेकडून ९० दिवसांची मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला

या अर्जावर शनिवारी सुनावणी पूर्ण

मोहोळचा पाच जानेवारीला कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला होता

बेस्टची फुकट्या प्रवाशांवर कारवाई, 38 लाखांचा दंड वसूल

बेस्टची फुकट्या प्रवाशांवर कारवाई, 38 लाखांचा दंड वसूल

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात बेस्टच्या भरारी पथकाने तब्बल 61 हजार फुकट्यांची धरपकड केलीये

तीन महिन्यात तब्बल 61 हजार 630 फुकट्या प्रवाशांची धरपकड करून त्यांच्याकडून ३७ लाख ७१ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आलीये

जानेवारी महिन्यात 25 हजार 79 फुकट्या प्रवाशांची धरपकड करून त्यांच्याकडून 15 लाख 39 हजार 789 रुपयांची दंड वसुली

फेब्रुवारी महिन्यात तिकीट तपासणी करणाऱ्या टीमने विना तिकीट प्रवास करणाऱ्या 21 हजार 247 फुकट्या प्रवाशांची धरपकड केली. तर त्यांच्याकडून 12 लाख 97 हजार 823 रुपये वसुली करण्यात आली

मार्च महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या 15 हजार 304 लोकांची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 9 लाख 34 हजार 190 रुपयांची वसुली करण्यात आली आहे

नंदुरबारमध्ये 65 लाख 32 हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी केला जप्त

अहमदाबाद येथून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनातून 65 लाख 32 हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी केला जप्त

टेम्पोसह एका संशयिताला अटक, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे ही कारवाई

भिवंडीत भंगारच्या गोदामाला भीषण आग, 15 ते 20 भंगार साठवलेली गोदाम जळून खाक

भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीत भंगारच्या गोदामाला रात्रीच्या सुमारास भीषण आग

15 ते 20 भंगारची गोदामे जळून खाक,

भंगारच्या गोदामात लाकडी प्लाय, प्लास्टिक वस्तू, कागदी पुठ्ठा यांसह मोठ्या प्रमाणात भंगार वस्तूची साठवणूक करण्यात आली होती

काही चार चाकी वाहन देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आली

आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही

नाशिकमध्ये दिवसाढवळ्या तीन सोनासाखळी चोरीच्या घटना

नाशिकच्या येवला शहरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास एकाच वेळी तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. सुऱ्याचा धाक दाखवत गळ्यावर सुरा ठेवत चोरट्यांनी सोनसाखळ्या लांबवल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत चोरट्यांचा माग काढत दोघांना पकडले.

राज्यातील जागावाटपाच्या प्रश्नावर दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

राज्यातील जागावाटपाच्या प्रश्नावर दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता

महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार, सूत्रांची माहिती

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता

राज्यातील 2-3 जागांचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने चर्चा होणार

सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांवरून अजूनही पेच कायम

INDIA आघाडीच्या बैठकीनंतर चर्चा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com