Today's Marathi News Live: ठाकरे गटाला मोठा धक्का; मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Latest News and Update in Marathi (8 March 2024) : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Today Live Batmya in Marathi (8 March 2024) | Latest Update on mahayuti, mahavikas agahdi, Loksabha Election 2024, women's day, mahashivratri, Political news and Overall Maharashtra
Today Live Batmya in Marathi (8 March 2024) | Latest Update on mahayuti, mahavikas agahdi, Loksabha Election 2024, women's day, mahashivratri, Political news and Overall MaharashtraSaam Tv
Published On

ठाकरे गटाला मोठा धक्का; मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. बोरिवली पूर्वेकडील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अमित शहा यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची बैठक

प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी तिन्ही नेत्यांची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचण्यापूर्वी तिघांमध्ये चर्चा

हृदयद्रावक! यवतमाळमध्ये वर्धा नदीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

यवतमाळच्या वर्धा नदीत तीन मुलं बुडाली, बुडालेल्या मुलांचा शोध सुरू

नदीपात्रात बुडालेल्या मृतक मुलांचा शोध सुरू

वणीच्या विठ्ठलवाडी येथील तिघांचा समावेश

राहुल गांधी पुन्हा वायनाडच्या जागेवरून लोकसभा लढवणार

सावंवाडीत ४३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना पुढील उपचारासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. याबाबतची माहिती सरपंच लवू भिंगारे यांनी दिली. सकाळी नाष्ट्यात वापरण्यात आलेल्या बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा शाळेतील शिक्षकांचा अंदाज आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान त्यातील विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी आज ७ वाजता जाहीर होणार.

पत्रकार परिषदेत नावे जाहीर होणार.

जवळपास ६० नावांची घोषणा होण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील कारचा किरकोळ अपघात

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील कारचा किरकोळ अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. परंडा येथून भूमकडे जात असताना वालवड परिसरात अपघात झाला. कार्यकर्त्यांनी भरलेली कार समोरील वाहनावर जाऊन आदळली.

विरारमध्ये प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

विरारमधील जाधवपाडा परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण

ही आग चार वाजत्याच्या सुमारास लागली .

या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा असल्याने ही आग वाढली आहे.

आगीमधून मोठमोठे धुराचे लोट पसरत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजप उमेदवारांची यादी लांबणीवर पडणार?

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची यादी पुन्हा लांबणीवर पडणार?

भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीची बैठक पुढे ढकलण्याची शक्यता

१० मार्च ऐवजी ११ मार्चला बैठक होणार - सूत्र

बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार

मुख्यमंत्री म्हणजे सामान्य माणूस, हीच पोटदुखी; CM शिंदेंची विरोधकांवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शुक्रवारी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'काही लोकांचे रड गाणे सुरू आहे. हे चोरले ते चोरले. पण बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. जे काही निर्णय घेतले, ते गोरगरिबांसाठी. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का, सोन्याचा चमचा घेऊन आलेले झाले पाहिजे. मुख्यमंत्री म्हणजे सामान्य माणूस हीच पोटदुखी आहे'.

गोंदियामध्ये मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना स्फोट

गोंदियामध्ये अर्जुनी तालुक्यातील सौदळ येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किराणांच्या दुकानाला भीषण आग लागली. यात गॅस सिलिंडर देखील फुटला आहे. विशाल शहरे, छत्रुघन ब्राह्मणकर यांचे दुकान जळून खाक झाले. यात लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दाखवले काळे झेंडे सकल मराठा युवकांनी दाखवले काळे झेंडे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दाखवले काळे झेंडे सकल मराठा युवकांनी दाखवले काळे झेंडे

नारायण राणे आज अहमदनगरच्या अकोळनेर येथे एका उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सकल मराठा युवक राणेंच्या ताफ्यासमोर केला विरोध...

काही युवकांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते ताब्यात तर काही युवकांनी गनिमी काव्याने नारायण राणेंच्या ताफ्या समोर दाखवले काळे झेंडे...

सोलापुरात विनापरवाना रॅली काढल्याने एमआयएमच्या 14 पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल

सोलापुरात विनापरवाना रॅली काढल्याने एमआयएमच्या 14 पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल

मोटारसायकल रॅली काढल्याने सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जमावबंदी आदेशाचा भंग करुन जमाव जमवला आणि सार्वजनिक रहदारीस अडथळा केल्याने पोलिसांनी कारवाई

मौलाली चौक, लष्कर, सात रस्ता या भागातून घोषणाबाजी करीत विनापरवाना काढली होती रॅली

एमआयएमचे गाझी सादिक जहागीरदार,सल्लाउद्दीन शेख,शोएब चौधरी, मोहसीन मैंदर्गीकर, बाबा पिरअहमद शेख आदी 60 जणांवर गुन्हा दाख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवले काळे झेंडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले

उसाचा दुसरा हप्ता 100 रुपये द्यावे शेतकऱ्यांची मागणी

ऊस आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी केली होती मध्यस्थी

नारायण राणेंना काळे झेंडे दाखवण्याआधी मराठा समाजाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज एका कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी जमलेल्या मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दहा वर्षे फक्त चर्चा, गॅरंटी नाही; धाराशिवमधून उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंनी धाराशिवमधील सभेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'दहा वर्षे फक्त चर्चा, गॅरंटी नाही. आम्ही कायदा मानणारी लोक म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपाच्या निवडणूक प्रचार आणि जाहिरात संबंधी निवडणूक आयोगाला तक्रार करणार : पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

भाजपच्या निवडणूक प्रचार आणि जाहिरात संबंधी आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार

मोदी की गॅरंटी या जाहिरातीतून केवळ एका व्यक्तींचा प्रचार हा सरकारी खर्चातून होत आहे

पंतप्रधान योजना किंवा सरकारची गॅरंटी असा उल्लेख केला तर काही हरकरत नाही

या जाहिरातीसाठी झालेला खर्च हा मोदीजी किंवा भाजपा यांच्याकडून वसूल करण्यात यावा

PM मोदींच्या नावाचा प्रचार सरकारी नसावा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं

निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती

निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती

सुधा मूर्ती यांना राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपती यांनी केलं नियुक्त

सुधा मूर्ती यांना राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपती यांनी केलं नियुक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत केलं अभिनंदन

सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अध्यक्षपदी नियुक्ती

रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अध्यक्षपदी नियुक्ती

कदम यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

⁠विद्यमान अध्यक्ष ए. एल. जऱ्हाड यांना हटवून कदम यांची नियुक्ती

⁠रामदास कदम हे देखील राज्याचे पर्यावरण मंत्री होते

या पदावर याआधी पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती केली जात होती

Mahayuti Seat Sharing Update : महायुतीच्या जागावाटपाबाबत आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

महायुतीच्या जागावाटपाबाबत आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित राहण्याची शक्यता

दिल्लीत अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक, जागावाटपावर होणार चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील दौरा आटपून सायंकाळी दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती

Loksabha Election : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

उमेदवारी जाहीर होण्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेत आहेत भेटीगाठी

वरळी, लालबाग, परेल, काळाचौकी, शिवडी भागात भाजपकडून दिला जातोय भर

उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीच नार्वेकरांनी सुरू केली तयारी

Today Live Batmya in Marathi (8 March 2024) | Latest Update on mahayuti, mahavikas agahdi, Loksabha Election 2024, women's day, mahashivratri, Political news and Overall Maharashtra
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आरक्षणावर हायकोर्टाचे राज्य सरकारला महत्वाचे निर्देश

Beed News : अंबाजोगाईत भगरीतून 20 जणांना विषबाधा,  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील निरपणा या गावात एकादशीनिमित्त केलेल्या भगरीतून 20 जणांना विषबाधा झालीय. या रुग्णांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या 20 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना केल्या.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचं गोखले पूल प्रकरणी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र

आदित्य ठाकरे यांचं गोखले पूल प्रकरणी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र

गोखले पूल प्रकरणी पालिका आयुक्त आणि रेल्वे समकक्ष अधिकाऱ्यांना निलंबित करा

आदित्य ठाकरे यांची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

Mumbai News : मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन सोमवारी होणार

मुंबईतील कोस्टल रोडचं उदघाटन सोमवारी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं उद्घाटन

पण नियोजन होत नसल्याने आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन

कोस्टल रोडची एक लेन खुली करण्यात येणार आहे

Today Live Batmya in Marathi (8 March 2024) | Latest Update on mahayuti, mahavikas agahdi, Loksabha Election 2024, women's day, mahashivratri, Political news and Overall Maharashtra
Akhilesh Yadav Viral Video : 'नेताजी, नोकरी मिळत नाहीय, पेपर लीक होतायेत'; तरुणांंच्या प्रश्नाला अखिलेश यादवांनी दिलेलं उत्तर व्हायरल

Raj Thackeray : राज ठाकरे नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात पोहचले

राज ठाकरे नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात पोहचले

काळाराम मंदिराबाहेर राज ठाकरे यांचं नाशिक ढोलच्या गजरात स्वागत

राज ठाकरे श्री काळारामाच्या चरणी नतमस्तक

राज ठाकरे यांच्याकडून सपत्नीक श्री काळारामाचं दर्शन आणि महाआरती

मंदिरात राज ठाकरेंकडून अभिषेक पूजा

पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे देखील राज यांच्यासोबत

Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १४०० कोटी

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १४०० कोटी

पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प काल सादर

पुढील वर्षभरात विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले व अर्धवट असलेल्या ३३ रस्‍त्यांचे भूसंपादन केले जाणार

विविध ठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर बांधणे यासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात सादर

सिमला ऑफिस ते आनंद ऋषिजी चौक, कात्रज कोंढवा गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर चौक २४ मीटर रस्ता, वारजे शिवणे नदीकाठचा रस्ता अशा अनेक रस्त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोर घाटात मध्यरात्री वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोर घाटात मध्यरात्री वाहतूक कोंडी

15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

रात्रीच्या वेळी अवजड वाहने सोडल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मध्यरात्री देखील मोठी वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनांचा रॉंग साईडने प्रवास

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात होणार नतमस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात होणार नतमस्तक

राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसह नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात जावून घेणार दर्शन

सकाळी 9.30 वाजेदरम्यान राज ठाकरे करणार श्री काळारामाची महाआरती

काळाराम मंदिरातून राज ठाकरे करणार लोकसभा निवडणुकीचा शंखनाद

त्याआधी हॉटेल एक्सप्रेस इन वरून निघाल्यानंतर राज ठाकरे यांचा शहरात ठीक ठिकाणी होणार जंगी स्वागत आणि सत्कार

तर उद्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचा १८ वा वर्धापन दिन होणार साजरा

पक्षाची आगामी वाटचाल आणि भूमिकेबाबत राज ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठिकठिकाणी मनसे कडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न

वाळू शिल्प कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी साकारलं शंकराचं शिल्प

परभणीतील जिंतूरमध्ये भगरीतून सात जणांना विषबाधा

भागवत एकादशी व महाशिवरात्रीच्या उंबरठ्यावर उपवास करणाऱ्या सात जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. काल भागवत एकादशीचा उपवास असल्यामुळे गावातील दुकानातून आणलेली भगर खाल्याने अनेकांना मळमळ, चक्कर, उलटी व पोटात दुखणे सुरु झाले. सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सर्व रुग्णावर ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे उपचार सुरू आहे.

TDP (तेलगू देसम पार्टी) चे नेते चंद्राबाबू नायडू यांनी रात्री उशीरा घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

TDP (तेलगू देसम पार्टी) चे नेते चंद्राबाबू नायडू यांनी रात्री उशीरा घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

आंध्र प्रदेशमधे भाजप आणि TDP chi युती जवळपास निश्चित, फक्त अधिकृत घोषणा बाकी

राज्यातील २५ लोकसभेच्या जागांपैकी TDP १४ जागा लढवणार तर भाजपच्या वाट्याला ८ जागा मिळण्याची शक्यता

स्थानिक जणसेना पक्षालाही सोबत घेण्यावर भाजपचा भर... तो पक्ष सोबत आला तर त्याला ३ जागा सोडण्याची दोन्ही पक्षांची तयारी

दक्षिण भारतात भाजपकडून जागा जिंकण्यासाठी स्थानिक पक्षासोबत युती करण्याची रणनीती

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६.५३ किलो सोन्याचे दागिने जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६.५३ किलो सोन्याचे दागिने जप्त

वेगवेगळ्या ७ कारवायांमध्ये एकूण ३.७३ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

कस्टम्स विभागाची कारवाई

सोन्याच्या दागिन्यांसह ८ आयफोन करण्यात आले जप्त

विमानाच्या कमोडेमध्ये लपवण्यात आले होते दागिने

तर प्रवाशांच्या शरीरातून, कपड्यातून आणि हेडफोनमधून केली जात होती सोन्याची तस्करी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com